Team India  Saam Tv
Sports

WTC Final: टीम इंडियासाठी गुड न्युज! WTC च्या अंतिम फेरीत जाण्याचा मार्ग मोकळा, पाहा समीकरण

भारतीय संघासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे

Ankush Dhavre

Ind vs Aus 4th test WTC Final: ऑस्ट्रेलिया संघाने तिसरा कसोटी सामना जिंकत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

तर भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये अंतिम फेरीत जाण्यासाठी चुरस पाहायला मिळत आहे.

भारतीय संघ अंतिम फेरीत प्रवेश करणार करणार की नाही हे काही दिवसात कळून जाईल. दरम्यान भारतीय संघासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. (Latest sports updates)

सध्या भारत विरुध्द ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये चौथा कसोटी सामना सुरु आहे. तर दुसरीकडे श्रीलंका आणि न्यूझीलंड संघांमध्ये देखील कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यावर देखील भारतीय संघाचे लक्ष असणार आहे.

श्रीलंका संघाने जर हा सामना गामालवा तर भारतीय संघ अंतिम फेरीत प्रवेश करणार आहे. श्रीलंका संघ सध्या बॅकफूटवर आहे. त्यामुळे भारतीय संघाचे अंतिम फेरीत प्रवेश करण्याचे दार उघडताना दिसून येत आहे.

श्रीलंका संघाने या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना ३५५ धावा केल्या आहेत. प्रत्युत्तरात न्यूझीलंड संघाचे ५ फलंदाज अवघ्या १५१ धावांवर माघारी परतले होते. ही खेळी पाहता भारतीय क्रिकेट चाहत्यांची चिंता वाढली होती.

मात्र आता भारतीय चाहत्यांना दिलासा मिळाला आहे. कारण न्यूझीलंड संघाने ३७३ धावा केल्या आहेत. आता हा सामना अनिर्णित जरी राहिला तरीदेखील भारतीय संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरणार आहे.

ऑस्ट्रेलिया विरुध्द सुरु असलेल्या मालिकेत भारतीय संघ २-१ ने आघाडीवर आहे. तर चौथ्या कसोटी सामन्यताही बरोबरीची लढत सुरु आहे. जर हा सामना भारतीय संघाने जिंकला तर भारतीय संघ थेट अंतिम फेरीत प्रवेश करणार आहे.

मात्र पराभूत झाल्यास श्रीलंका विरुध्द न्यूझीलंड यांच्यातील मालिकेच्या निकालावर अवलंबून राहावे लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नाशिकमध्ये शिंदेंच्या शिवसेनेच्या अजय बोरस्ते यांची गटनेतेपदी निवड

Akola Mayor: अकोल्याला आज महापौर मिळणार, कोण बसणार खुर्चीवर? भाजप सत्ता कायम राखणार का?

Panchang Today: आज शुक्र प्रदोष व्रताचा संयोग! मिथुनसह चार राशींसाठी लाभदायक दिवस

Shahrukh Khan: चष्मा काढायला लावला, आयडी बघितला...; एयरपोर्टवर किंग खानची झाली चेकिंग, नेमकं कारण काय?

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट! १२ फेब्रुवारीला मोठा निर्णय होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT