Team India Break Pakistans Record espn
Sports

IND vs ZIM: झिम्बाब्वेचा पराभव करत टीम इंडियाची ऑस्ट्रेलिया,पाकिस्तानला मात; तोडला टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा रेकॉर्ड

Team India Break Pakistans Record: भारतीय संघाने झिम्बाब्वेच्या संघाचा दुसऱ्या टी२० सामन्यात पराभूत केलं. भारतीय फलंदाज आणि गोलंदाजांनी केलेल्या दिमाखदार कामगिरीमुळे भारताने झिम्बाब्वेसह पाकिस्तानला मात दिलीय. ते कसं जाणून घेऊ.

Bharat Jadhav

भारतीय संघाने दुसऱ्या टी २० आंतरराष्ट्रीय सामन्यात दमदार कामगिरी करत झिम्बाब्वे संघाचा १०० धावांनी पराभव केला. या विजयासह भारताच्या संघाने पाच टी२० सामन्याच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी केलीय. झिम्बाब्वेच्या संघाने पहिला सामना १३ धावांनी भारताचा पराभव केला होता. पहिल्या सामन्यातील चुका सुधारत भारतीय संघाने दमदार कामगिरी केली. झिम्बाब्वेच्या गोलंदाजांना चोपल्यानंतर भारतीय संघाच्या गोलंदाजांनी त्यांच्या फलंदाजांना गुडघे टेकायला लावले. परंतु भारताच्या या विजयाने झिम्बाब्वेसह पाकिस्तानला मात मिळालीय.

झिम्बाब्वेविरुद्ध भारतीय संघाचा कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत २३४ धावा केल्या. यानंतर आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या झिम्बाब्वेचा संघ केवळ १३४ धावांवर ऑलआऊट झाला. अशाप्रकारे टीम इंडियाने हा सामना १०० धावांनी जिंकला.

टीम इंडिया टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने १००पेक्षा अधिक धावांनी जिंकणारा संघ बनलाय. भारताने पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियाचे रेकॉर्ड नष्ट केले आहेत. पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियाने टी २० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४-४ सामने १०० पेक्षा जास्त धावांनी जिंकलेत. तर भारतीय संघाने टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० पेक्षा जास्त धावांनी ५ सामने जिंकलेत.

टी२० मध्ये सर्वाधिक १०० पेक्षा जास्त धावांनी विजय मिळवलेले संघ:

भारतीय संघ - ५ विजय

ऑस्ट्रेलिया - ४ विजय

इंग्लंड - ३ विजय

अफगाणिस्तान- ३ विजय

T20I मधील भारताचे पाच सर्वात मोठे विजय

भारतीय संघाने टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १६८ धावांनी सर्वात मोठा विजय नोंदवला. त्यानंतर टीम इंडियाने न्यूझीलंडचा पराभव केला होता. भारताने आयर्लंडविरुद्ध १४३ धावांनी, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध १०६ धावांनी आणि अफगाणिस्तानविरुद्ध १०१ धावांनी सामना जिंकला. आता टीम इंडियाने झिम्बाब्वेवर १०० धावांनी विजय मिळवला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra School: पहिलीच्या वेळापत्रकातून हिंदी हद्दपार, सुधारित वेळापत्रक जाहीर

Shukrawar che Upay: शुक्रवारच्या दिवशी 'या' चमत्कारी उपायांनी नशीब उजळेल; करियर-कुटुंबातील अडखळे होतील दूर

Indore Street Food: फक्त पोहेच नाही, इंदूरची 'हे' स्ट्रीट डिशेस देखील आहेत अव्वल दर्जाचे

Maharashtra Live News Update: विठ्ठलाची पदस्पर्श दर्शन रांग गोपाळपूरपर्यंत जाऊन पोहोचली

Post Office Scheme: पोस्टाची जबरदस्त योजना! एकदा गुंतवणूक करा अन् फक्त व्याजातून दर महिन्याला मिळवा ५५०० रुपये

SCROLL FOR NEXT