भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने आपल्य नव्या इनिंगची सुरुवात केली आहे. बॅडमिंटन विश्व गाजवणारी आणि फुलराणी म्हणून ओळखली जाणारी पीव्ही सिंधू उद्योगपती वेंकट दत्त साई यांच्यासोबत विवाह बंधनात अडकली आहे. पीव्ही सिंधू आणि वेंकट दत्त साई यांचा विवाहसोहळा रविवारी ( २२ डिसेंबर) उदरपूरमध्ये पार पडला.
पीव्ही सिंधूच्या विवाह सोहळ्याला अनेक दिग्गज मंडळींनी हजेरी लावली होती . यासह कुटुंबातील सदस्य आणि मित्र मंडळीही उपस्थित होते. या दोघांच्याही विवाह सोहळ्यातील फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
सध्या सोशल माीडियावर एक फोटो व्हायरल होतोय. ज्यात जोधपूरमधील सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री गजेंद्र सिंग शेखावत असल्याचे दिसून येत आहेत. व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, गजेंद्र सिंग शेखावत या नवविवाहीत जोडप्याला आशीर्वाद देताना दिसून येत आहेत.
फोटो शेअर करत त्यांनी कॅप्शनही दिलं आहे. त्यांनी कॅप्शन म्हणून लिहिलं, ' बॅडमिंटन चॅम्पियन पीव्ही सिंधू आणि वेंकट दत्त साई यांच्या विवाह सोहळ्याला उपस्थित राहुन आनंद झाला. दोघांनही नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा.
पीव्ही सिंधूबद्दल काही नव्याने सांगायची गरज नाही. ऑलिम्पिक स्पर्धेत कोट्यवधींची मान अभिमानाने उंचावणाऱ्या पीव्ही सिंधूने आपल्या नव्या इनिंगची सुरुवात केली आहे. तर वेंकट दत्त साई बद्दल बोलायचं झालं, तर ते Posidex Technologies या कंपनीमध्ये कार्यकारी संचालक पदावर कार्यरत आहेत.
पीव्ही सिंधू गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने स्पर्धा खेळण्यात व्यस्त होती. आता वेळ मिळताच तिने विवाह सोहळा उरकला आहे. दोघांचा विवाह सोहळा २२ डिसेंबरला पार पडला असून, येत्या २४ डिसेंबरला हैदराबादमध्ये रिसेप्शन होणार आहे.
विवाह झाल्यानंतरही तिला फार काळ विश्रांती मिळणार नाहीये. कारण, येत्या काही दिवसात महत्वाच्या स्पर्धा खेळायच्या आहेत. लग्नाच्या काही दिवसांपूर्वीच तिने सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत विजय मिळवला होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.