पॅरिस ऑलिंपिक २०२४ स्पर्धेत पीव्ही सिंधूला पदक जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार मानलं जात होतं. मात्र तिला चीनच्या बिंग जिआओकडून पराभवाचा सामना करावा लागला आहे. यासह पॅरिस ऑलिंपिक २०२४ स्पर्धेत तिचा प्रवास समाप्त झाला आहे. सात्विकराज आणि चिराग शेट्टी यांचा पराभव हा भारतीय फॅन्ससाठी सर्वात मोठा धक्का होता. त्यानंतर एकाच दिवशी २ पदक जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार असणाऱ्या खेळाडूंचा पराभव हा भारतीय फॅन्सला न पचणारा आहे.
पीव्ही सिंधू आणि बिंग जिआओ या दोन्ही खेळाडूंमध्ये काँटे की टक्कर पार पडली. पहिल्या गेममध्ये बिंग जिआओने आघाडी घेतली. तिने पीव्ही सिंधूला कमबॅक करण्याची संधीच दिली नाही. बिंग जिआओ १० गुणांच्या जवळ असताना पीव्ही सिंधू संघर्ष करताना दिसून येत होती. मात्र पीव्ही सिंधूने दमदार कमबॅक केलं आणि बरोबरी साधली. मात्र डावखुऱ्या हाताच्या बिंग जिआओने सिंधूच्या बॉडीलाईनवर अटॅक करणं सुरु ठेवलं. मात्र हा गेम सिंधूला २१-१९ ने गमवावा लागला.
दुसऱ्या गेममध्येही बिंग जिआओ दमदार सुरुवात केली. पहिला गेम जिंकून आघाडी घेतलेल्या बिंग जिआओने दुसऱ्या गेममध्येही शानदार सुरुवात केली. मात्र सिंधूने लागोपाठ ३ पाँईंट्स घेत बरोबरी साधण्याचा प्रयत्न केला. मात्र या गेममध्येही सिंधूकडून ती स्पीड आणि ती मुवमेंट दिसून आली नाही. या गेममध्ये पीव्ही सिंधूला २१-१४ ने पराभवाचा सामना करावा लागला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.