narendra modi  Twitter
Sports

IND VS AUS 4th Test: चौथा कसोटी सामना पाहण्यासाठी दोन्ही देशातील पंतप्रधानांची उपस्थिती; नरेंद्र मोदी कॉमेंट्री करण्याची शक्यता

हा सामना पाहण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बनीज उपस्थित झाले आहेत.

Ankush Dhavre

PM Narendra Modi : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra modi stadium) भारत विरुध्द ऑस्ट्रेलिया (Ind vs aus 4th test) या दोन्ही संघांमधील ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अंतिम कसोटी सामना सुरु आहे.

या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यासाठी दोन्ही देशातील पंतप्रधानांनी हजेरी लावली आहे.( Latest sports updates)

हा सामना दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाचा असणार आहे. कारण हा सामना जिंकून भारतीय संघाला मालिका जिंकण्याची संधी असणार आहे.

तर ऑस्ट्रेलिया बरोबरीत आणण्याची संधी असणार आहे. हा सामना पाहण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra modi) आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बनीज (Anthony Albanese) उपस्थित झाले आहेत.

हा सामना सुरु होण्यापूर्वी नरेंद्र मोदी आणि अँथनी अल्बनीज यांनी एका विशिष्ट प्रकारच्या रथात बसून पूर्ण मैदानाची प्रदक्षिणा घातली. तसेच मैदानावर सामना पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांना हात दाखवून अभिवादन देखील केले.

नरेंद्र मोदी आणि अल्बानीज यांची भेट हा भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मैत्रीला 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या समारंभाचा एक भाग आहे. मिळालेल्या माहितीनुसार दोन्ही देशाचे पंतप्रधान दिड तास या सामन्याचा आनंद घेणार आहेत.

या सामन्यासाठी अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११

भारत :

रोहित शर्मा(कर्णधार), शुभमन गिल,चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत( यष्टिरक्षक), रवींद्र जडेजा, आर अश्विन, अक्षर पटेल, उमेश यादव, मोहम्मद शमी

ऑस्ट्रेलिया :

उस्मान ख्वाजा, ट्रेविस हेड, मार्नस लाबुशेन, स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), पिटर हँड्सकाँब, कॅमरन ग्रीन, ॲलेक्स कॅरी (यष्टिरक्षक), मिचेल स्टार्क, नाथन लायन, टॉड मर्फी, मॅथ्यू कुन्हेमन

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update :मराठा आरक्षणाचा जीआर मागे घ्या, अथवा बदल करा, छगन भुजबळांची मागणी

'अजित पवारांचं पाप देवेंद्र फडणवीसांनी लपवलं, मोदींकडून पाठिंबा' विजय पांढरेंचा खळबळजनक आरोप

Actor Death Threats : जर तुझ्या आई, बहिणीला काहीही सांगितलंस...; प्रसिद्ध अभिनेत्याला जीवे मारण्याच्या धमक्या

Chanakya Niti : ही ३ गुपितं कोणालाही सांगू नका; नाहीतर जवळचे मित्रसुद्धा होतील शत्रू

Nepal Protest : नेपाळ पेटलं! माजी मंत्र्याचे घर पेटवलं, राष्ट्रपतींच्या घरावर कब्जा, पंतप्रधान देश सोडण्याच्या तयारीत

SCROLL FOR NEXT