shikhar dhawan saam tv
क्रीडा

India vs West Indies: टीम इंडियाची घोषणा अन् 'या' 3 खेळाडूंची कारकीर्दच संपली ! आता निवृत्तीशिवाय पर्याय नाही

Team India: ३ खेळाडू असे आहेत, ज्यांची कारकीर्द आता शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे.

Ankush Dhavre

Indian Players Retirement: वेस्ट इंडिजविरुद्ध होणाऱ्या ५ टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या मालिकेसाठी रोहित शर्मा नव्हे तर हार्दिक पंड्याची कर्णधार म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. तर सूर्यकुमार यादवला उपकर्णधाराची जबाबदारी देण्यात आली आहे. अजित आगरकरची मुख्य निवडकर्ता म्हणून निवड होताच या संघाची घोषणा करण्यात आली आहे. दरम्यान ३ खेळाडू असे आहेत, ज्यांची कारकीर्द आता शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे.

अजित आगरकरच्या अध्यक्षतेखाली असलेल्या निवड समितीने १५ सदस्यांची निवड केली आहे. आगामी टी-२० मालिकेसाठी विराट कोहली आणि रोहित शर्मासारख्या खेळाडूंना विश्रांती दिली गेली आहे. तर यशस्वी जयस्वाल आणि तिलक वर्मासारख्या खेळाडूंना संधी देण्यात आली आहे.

शिखर धवन:

डाव्या हाताचा सलामीवीर फलंदाज शिखर धवन बरेच वर्ष भारतीय संघासाठी डावाची सुरुवात करताना दिसून आला आहे. मात्र गेल्या काही महिन्यांपासून त्याला संघात स्थान मिळवणंही कठीण झालं आहे. यावर्षी भारतात वनडे वर्ल्डकप स्पर्धेचा थरार रंगणार आहे. मात्र तरीदेखील धवनला संघात स्थान दिलं गेलं नाही. यावरून स्पष्ट होतंय की, शिखर धवनचं भारतीय संघात कमबॅक होणं कठीण आहे. (Latest sports updates)

ईशांत शर्मा :

भारतीय संघातील अनुभवी गोलंदाज ईशांत शर्मा देखील आपल्या कारकिर्दीतील शेवटच्या टप्प्यात आहे. त्याने भारतीय संघासाठी कमबॅक केलं होतं. मात्र वेस्ट इंडिजविरुद्ध होणाऱ्या २ कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी त्याला दुर्लक्ष केलं गेलं आहे. ३४ वर्षीय ईशांत शर्माने आपल्या कारकिर्दीत एकूण १०५ कसोटी सामने खेळले, यादरम्यान त्याने ३११ गडी बाद केले. तर ८० वनडे सामन्यांमध्ये ११५ आणि १४ टी -२० सामन्यांमध्ये ८ गडी बाद केले आहेत. मात्र युवा खेळाडूंना संधी मिळत असताना ईशांत शर्माचं कमबॅक होणं कठीण आहे.

हर्षल पटेल:

हर्षल पटेलला देखील भारतीय संघात स्थान मिळवणं कठीण झालं आहे. त्याला भारतीय संघासाठी २५ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याची संधी मिळाली आहे. यादरम्यान त्याने २९ गाडी बाद केले आहेत. त्याला टी -२० फॉरमॅट वगळता इतर फॉरमॅटमध्ये भारतीय संघाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली नाही. मात्र आता त्याला संघात संधी मिळणंही कठीण झालं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT