jasprit bumrah saam tv
Sports

Jasprit Bumrah Comeback: टीम इंडियाची ताकद आणखी वाढणार! जसप्रीत बुमराह 'या' मालिकेतून करणार कमबॅक

Yorker King Of Team India: आता जसप्रीत बुमराहच्या कमबॅकबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

Ankush Dhavre

Team India Bowler Update: भारतीय संघातील दिग्गज गोलंदाज जसप्रीत बुमराह हा गेल्या काही महिन्यांपासून संघाबाहेर आहे. तो सप्टेंबर २०२२ मध्ये आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला होता.

त्यानंतर पाठीच्या दुखण्यामुळे संघाबाहेर झाला होता. क्रिकेट चाहते जसप्रीत बुमराहच्या पुनरागमनाची क्रिकेट चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान आता जसप्रीत बुमराहच्या कमबॅकबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

जसप्रीत बुमराहचं कमबॅक होणार..

जसप्रीत बुमराह पूर्णपणे फिट झाला असून तो आता कमबॅक करण्यासाठी पूर्णपणे सज्ज झाला आहे. इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, जसप्रीत बुमराह आयर्लंडविरुद्ध होणाऱ्या टी-२० मालिकेतून कमबॅक करताना दिसून येणार आहे. या दौऱ्यासाठी भारतीय संघाची ब तुकडी पाठवली जाऊ शकते. सध्या जसप्रीत बुमराह नॅशनल क्रिकेट अॅकेडमीत सराव करतोय.

जसप्रीत बुमराहची कमतरता..

जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत भारतीय संघाला महत्वाच्या सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. भारतीय संघाला आशिया कप २०२२ आणि टी -२० वर्ल्डकप २०२२ स्पर्धेत पराभवाचा सामना करावा लागला होता.

तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२३ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात देखील भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. मात्र भारतीय संघासाठी आनंदाची बाब अशी की, आशिया चषक आणि वर्ल्डकप सारख्या स्पर्धा तोंडावर असताना जसप्रीत बुमराहचे भारतीय संघात कमबॅक होत आहे. (Latest sports updates)

जसप्रीत बुमराहची कारकीर्द..

जसप्रीत बुमराह हा भारतीय संघातील प्रमुख गोलंदाजांपैकी एक आहे. त्याने भारतीय संघासाठी ३० कसोटी सामन्यांमध्ये १२८, ७२ वनडे सामन्यांमध्ये १२१ आणि ६० टी-२० सामन्यांमध्ये ७० गडी बाद केले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : पुण्यातील पाचही मानाच्या गणपतीचे विसर्जन

राफेल विमान प्रतिकृतीतून लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी; गणेश विसर्जन सोहळ्यात भक्तांचा उत्साह शिगेला|VIDEO

Chandragrahan 2025: चंद्रग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी काय करावे आणि काय टाळावे?

Aadhaar Verification : आधार कार्ड खरे की खोटे? फसवणुकीपासून सावध राहण्यासाठी आवश्यक टिप्स

Pune Ganpati Visarjan: पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचे भव्य विसर्जन संपन्न|VIDEO

SCROLL FOR NEXT