Carlos Alcaraz: विम्बल्डन २०२३ स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी पार पडला. या सामन्यात नोवाक जोकोविचला अंतिम फेरीत पराभूत करत कार्लोस अल्कारेझने जेतेपदाला गवसणी घातली आहे. त्याने जोकोविचला पाचव्या सेटमध्ये चितपट करत जेतेपद पटकावलं आहे .
स्पेनचा हा खेळाडू सध्या जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी आहे. यापूर्वी त्याने १९ व्या वर्षी युएस ओपन स्पर्धेच्या जेतेपदाला गवसणी घातली होती. (Carlos Alcaraz)
कोण आहे कार्लोस अल्कारेझ?
कार्लोस अल्कारेझ हा स्पेनमधील एल परमार या गावात राहतो. त्याचा जन्म ५ मे २००३ रोजी झाला. कार्लोस अल्कारेझचे वडील टेनिस फॅसिलिटी सेंटर चालवायचे. इथूनच त्याला टेनिसचं प्रशिक्षण मिळालं.
युरोप आणि स्पेनमध्ये त्याने अनेक स्पर्धा जिंकल्या. वयाच्या १६ व्या वर्षी त्याने रामोस विनोलासला पराभूत करत एटीपी स्पर्धेतील पहिला सामना जिंकला होता. त्याला घडविण्यात माजी नंबर १ खेळाडू जुआन कार्लोसने मोलाची भूमिका बजावली आहे. (Who Is Carlos Alcaraz)
कार्लोस अल्कारेझ हा रँकिंगमध्ये अव्वल स्थानी येणारा स्पेनचा चौथा खेळाडू आहे. यापूर्वी राफेल नदाल, कार्लोस मोया आणि जुआन कार्लोस फरेरोने देखील अव्वल स्थान गाठलं आहे. जोकोविच हा जगज्जेता खेळाडू आहे.
मात्र कार्लोस अल्कारेझकडून नोवाक जोकोविच (Novak Djokovic) पराभूत होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी देखील त्याने मेद्रिड ओपनच्या सेमीफायनलमध्ये जोकोविचला पराभवाचा सामना करावा लागला आहे. हे दोघेही ३ वेळेस आमने सामने आले आहेत. ज्यात कार्लोस अल्कारेझ २-१ ने पुढे आहे. (Latest sports updates)
हा कार्लोस अल्कारेझच्या कारकिर्दीतील ग्रँड स्लॅमचा दुसरा खिताब ठरला. यापूर्वी त्याने २०२२ यूएस ओपन स्पर्धेचा खिताब पटकावला होता. तसेच २०२२ मध्ये तो राफेल नदाल आणि जोकोविचला पराभूत करणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला होता. तसेच नंबर जगातील क्रमवारीत नंबर १ स्थान गाठणारा तो सर्वात तरुण खेळाडू आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.