indian hockey team, covid 19 saam tv
Sports

भारतीय हॉकी संघात काेराेनाचा शिरकाव; दाेन खेळाडूंसह पाच जणांना लागण

मनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ 31 जुलैला घानाविरुद्ध पहिला सामना खेळेल.

साम न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली: राष्ट्रकुल स्पर्धेसाठी (commonwealth games 200) सुरु असलेल्या भारतीय हॉकी (hockey) संघातील शिबिरात काेराेनाचा (corona) प्रादुर्भाव झाला. या संघातील स्ट्रायकर गुरजंत सिंग आणि मुख्य प्रशिक्षक ग्रॅहम रीड यांच्यासह काही कर्मचा-यांना काेराेनाची लागण झाली आहे. त्या सर्वांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. (hockey latest marathi news)

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेची तयारी करणाऱ्या भारतीय पुरुष हॉकी संघातील दोन खेळाडूंना आणि सपोर्ट स्टाफचे तीन सदस्यांना कोविड-19 ची लागण झाली आहे असे हॉकी इंडियाने कोणाचेही नाव न घेता प्रसिद्धी माध्यमांना कळविले. टीमच्या एका सूत्राने सांगितले की, "गुरजंत आणि ग्रॅहम रीड यांना संसर्ग झाला आहे. टीमच्या व्हिडिओ विश्लेषकाची चाचणीही पॉझिटिव्ह आली आहे."

एफआयएच हॉकी प्रो लीगमध्ये बेल्जियम आणि नेदरलँड्सविरुद्ध खेळल्यानंतर हे खेळाडू कॅम्पमध्ये दाखल झाले आहेत. पीआर श्रीजेश, मनप्रीत सिंग, पवन कुमार, ललित कुमार उपाध्याय, हरमनप्रीत सिंग, वरुण कुमार आणि अमित रोहिदास बंगळुरू येथील भारतीय क्रीडा प्राधिकरण (SAI) कॅम्पसमध्ये सुरू असलेल्या शिबिरात सहभागी होत आहेत.

मनप्रीत सिंग, हार्दिक सिंग, समशेर सिंग, विवेक सागर प्रसाद, आकाशदीप सिंग, नीलकांत शर्मा गुरजंत सिंग, मनदीप सिंग, दिलप्रीत सिंग, सुखजीत सिंग, ललित कुमार उपाध्याय, अभिषेक, गुरसाहिबजीत सिंग, मनदीप मोर, संजय मोहम्मद राहिल मौसेन, सुमित, मोइरंगथेम रबिचंद्र सिंग, गुरिंदर सिंग, जसकरण, आशिष कुमार टोप्नो आणि शिलानंद लाक्रा यांना बाेलाविण्यात आले आहे. या शिबिराचा समारोप 23 जुलैला होईल. त्यानंतर संघ बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी रवाना होईल.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : राज ठाकरे उद्या पुणे दौऱ्यावर

Amaravati Politics: मतदानापूर्वी भाजपकडून मोठी कारवाई, १५ पदाधिकाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन

Bhandara : अन् अचानक आकाशातून पडले दगडाचे तुकडे, भंडार्‍यात उल्का वर्षाव झाल्याचा संशय, नेमकं सत्य काय?

Homemade Toner : तुम्हाला त्वचेचा ग्लो वाढवायचा आहे? मग हे ५ स्वस्तात मस्त टोनर घरीच बनवा

Prasar Bharti Jobs: प्रसार भारतीमध्ये नोकरीची संधी; मिळणार भरघोस पगार; अर्ज कसा करावा?

SCROLL FOR NEXT