indian kabaddi team  saam tv
Sports

Asian Kabaddi Championship 2023: टीम इंडियाच ठरली एशियन चॅम्पियन्स! फायनलमध्ये इराणला धूळ चारत पटकावलं जेतेपद

India vs Iran Final : आशियाई कब्बडी चॅम्पियनशिप २०२३ स्पर्धेचा थरार रिपब्लिक ऑफ कोरियातील बुसान येथे पार पडला.

Ankush Dhavre

Asian Kabaddi Champions 2023 Final: आशियाई कब्बडी चॅम्पियनशिप २०२३ स्पर्धेचा थरार रिपब्लिक ऑफ कोरियातील बुसान येथे पार पडला. या संपूर्ण स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी दमदार कामगिरी केली. स्पर्धेतील अंतिम सामन्यात भारतीय संघाने बलाढय इराणला ४२-३२ ने पराभूत करत जेतेपदाला गवसणी घातली आहे. यासह आठव्यांदा जेतेपदाला गवसणी घातली आहे.

भारतीय संघाचे नेतृत्व करण्याची जबाबददारी पवन शेरावतकडे देण्यात आली होती. त्याने ही जबाबदारी योग्यरीत्या पार पाडली. अंतिम सामना सुरु होताच पहिल्या ५ मिनिटात त्याने सुपर १० पूर्ण केले.

या दमदार कामगिरीच्या बळावर इराणचा संघ अवघ्या १० मिनिटात ऑल आउट झाला. या सामन्यात भारतीय संघातील खेळाडूंकडून अष्टपैलू कामगिरी पाहायला मिळाली. अस्लम इनामदार आणि पवन शेरावत यांनी चढाई करताना एका पाठोपाठ एक पॉइंट्स गोळा केले. इराणच्या संघाला १९ व्या मिनिटाला दुसऱ्यांदा ऑल आउटची चव चाखावी लागली.

शेवटच्या मिनिटांचा थरार..

भारतीय संघाने या सामन्यातील पहिल्या हाल्फमध्ये २३-११ ने आघाडी घेतली होती. या सामन्यातील २९ व्या मिनिटाला भारतीय संघ पहिल्यांदा ऑल आउट झाला. शेवटची काही मिनिटे शिल्लक असताना दोन्ही संघांना विजयाची समान संधी होती.

सामना संपायला २ मिनिटे शिल्लक असताना स्कोअर ३८-३१ असा होता. इथून इराणला कमबॅक करण्याची संधी होती. मात्र हा सामना भारतीय संघाने ४२-३२ ने जिंकला.

या सामन्यापूर्वी भारतीय संघाने हाँगकाँग संघावर ६४-२० ने विजय मिळवला होता. भारतीय संघाने या संपुर्ण सामन्यात दमदार कामगिरी केली. भारतीय संघाकडून कर्णधार पवन शेरावत आणि युवा असलम इनामदारने चढाई करताना उल्लेखनीय कामगिरी केली. (Latest sports updates)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Thursday : गुरुवारी त्रयोदशीला उजळणार, वाचा राशीभविष्य

Harshvardhan jadhav : रावसाहेब दानवे यांच्या जावयाला एका वर्षांचा तुरुंगवास, कारण काय? VIDEO

Hindustani Bhau: कोल्हापूरकरांना हिंदुस्तानी भाऊच्या शिव्या;भाऊला 'वनतारा'चा पुळका

High Court: फ्लॅट आकारनुसार द्यावा लागेल मेंटेनन्स; हायकोर्टाचा मोठा निर्णय

Dada Bhuse: शाळेत राष्ट्रगीतानंतर आता 'गर्जा महाराष्ट्र माझा' राज्यगीत गाणे बंधनकारक

SCROLL FOR NEXT