Hindustani Bhau: कोल्हापूरकरांना हिंदुस्तानी भाऊच्या शिव्या;भाऊला 'वनतारा'चा पुळका

Kolhapur Slams Hindustani Bhau On Mahadevi Elephant : तथाकथित रिलस्टार हिंदुस्थानी भाऊनं माधुरी हत्तीणीवरून कोल्हापूरकरांना शिव्या दिलेत. त्यामुळे कोल्हापूरकरांनी भाऊला चांगलाच हिसका दिलाय. नेमकं काय घडलं? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून.
Kolhapur Slams Hindustani Bhau
Kolhapur Slams Hindustani Bhau
Published On
Summary
  • हिंदुस्थानी भाऊने कोल्हापूरकरांबद्दल वापरलेली अश्लील भाषा सोशल मीडियावर व्हायरल झाली.

  • माधुरी हत्तीणीवरून सुरू असलेल्या वादावरून भाऊने संताप व्यक्त करताना सीमारेषा ओलांडल्या.

  • कोल्हापूरमधील नागरिकांनी सोशल मीडियावरून भाऊच्या वक्तव्यांचा निषेध केला.

  • प्रकरण वाढल्याने सोशल मीडियावर भाऊविरोधात मोठा ट्रेंड सुरू झाला आहे.

हातात सोन्याच्या अंगठ्या, गळ्यात सोनसाखळी आणि तोंडातून अर्वाच्च भाषेत शिवीगाळ.. हा आहे.. विकास पाठक उर्फ रिल्स्टार हिंदुस्थानी भाऊ..याचं हिंदुस्थानी भाऊनं माधुरी हत्तीणीवरून थेट कोल्हापूरकरांना शिवीगाळ करत आक्षेपार्ह विधान केलीयेत. माधुरीसाठी सोशल मीडियातून कोल्हापूरकरांनी रान उठवलेलं असताना पेटानं समाजमाध्यमांवर टाकलेले पुराव्यांचा दाखला देत हिदुस्थानी भाऊ पुन्हा बरळलाय.

Kolhapur Slams Hindustani Bhau
Dada Bhuse: शाळेत राष्ट्रगीतानंतर आता 'गर्जा महाराष्ट्र माझा' राज्यगीत गाणे बंधनकारक

पाहिलतं, ही या मस्तवाल हिंदुस्थानी भाऊची शिवराळ भाषा माधुरीवरून एकत्र आलेले कोल्हापूरकर इतके दिवस कुठे होते? असा सवालही हा हिंदुस्थानी भाऊ विचारतोय..या मस्तवाल हिंदुस्तानी भाऊचा माज उतरवण्याचा इशाराच कोल्हापूरकरांनी दिलाय. सोशल मिडीयावरच कोल्हापूरकरांनी या हिंदुस्थानी भाऊला आपला हिसका दाखवल्यानंतर त्याने कॉमेंटचा ऑपशन आपल्या पेजवरून काढून तर टाकलाच पण या दणक्यानंतर त्याला कोल्हापूरकरांची माफी मागावी लागली.

Kolhapur Slams Hindustani Bhau
Mahadevi Elephant: अखेर ठरलं! महादेवी हत्तीणी कोल्हापुरात येणार

हिंदुस्थानी भाऊ सातत्यानं सामाजिक तेढ वाढवणाऱ्या व्हिडीओमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलाय. त्यात आता कोल्हापूरकरांच्या नादी लागल्यानं भाऊंचाच गेम झालाय. त्यामुळे या भाऊची भाऊगिरी नेमकी कुणाच्या फायद्यासाठी होती? शिवराळ भाषा वापरून कोल्हापूरकारांना डिवचण्याचा खोडसाळपणा त्यानं नेमकं का केला? 'पेटा'च्याच पुराव्यांवरून हिंदुस्थानी भाऊनं माधुरीला परत आणू नये यासाठी वाद कशासाठी पेटवला? याची उत्तर या तथाकथित रिल्सस्टारला द्यावीच लागतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com