Dada Bhuse: शाळेत राष्ट्रगीतानंतर आता 'गर्जा महाराष्ट्र माझा' राज्यगीत गाणे बंधनकारक

Education Minister Dada Bhuse : महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी सर्व शाळांमध्ये, माध्यम कोणत्याही असो, राष्ट्रगीतानंतर 'गर्जा महाराष्ट्र माझा' हे राज्यगीत गायले पाहिजे, अशी घोषणा केलीय. नियमांचे पालन न करणाऱ्या शाळांवर कारवाई होऊ शकते.
Dada Bhuse
Dada BhuseSaam tv
Published On
Summary
  • आता सर्व शाळांमध्ये राष्ट्रगीतानंतर 'गर्जा महाराष्ट्र माझा' राज्यगीत गाणे बंधनकारक.

  • शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी नियम न पाळणाऱ्या शाळांवर कारवाईचा इशारा दिला.

  • सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये हा नियम लागू होणार.

  • शिष्यवृत्ती परीक्षा आता ४, ५, ७ आणि ८वीसाठी घेतली जाणार.

मराठी शाळेसोबतचं आता सर्व माध्यमाच्या शाळेत राष्ट्रगीतानंतर राज्यगीत गाणे बंधनकारक करण्यात आलंय. 'गर्जा महाराष्ट्र माझा' हे राज्यगीत आता सर्वच शाळांमध्ये गाणे बंधनकारक असणार आहे. जी शाळा याची अंमलबजावणी करणार नाही त्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दिलाय.

मराठी शाळेसोबत आता सर्व माध्यमाच्या शाळेतही राष्ट्रगीतानंतर राज्यगीत गाणं बंधनकारक आहे, असा आदेश देण्यात आलाय. पूर्वी इयत्ता चौथी आणि सातव्या वर्गाची शिष्यवृत्ती परीक्षा होत होती. त्यानंतर पाचव्या आणि आठव्या वर्गाची शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली. आता यानंतर इयत्ता चौथी, पाचवी, सातवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा घेऊन शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्याचा संकल्प शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केला.

Dada Bhuse
Mahadevi Elephant: अखेर ठरलं! महादेवी हत्तीणी कोल्हापुरात येणार

शालेय शिक्षण विभाग उच्च दर्जाच्या शिक्षणासोबतच आता विद्यार्थ्यांच्याही आरोग्याची काळजी घेणार आहे. यापूर्वी विद्यार्थ्यांची तपासणी व्हायची ती औपचारिकरित्या होत होती. मात्र, आता पालकांच्या उपस्थितीत आरोग्य पथक विद्यार्थ्यांची तपासणी करणार आणि त्यानंतर विद्यार्थ्यांना एक हेल्थ कार्ड देण्यात येणार. हे हेल्थ कार्ड त्यांना आयुष्यात अनेक ठिकाणी उपयुक्त पडणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिलीय.

Dada Bhuse
Central Govt Scheme: पहिल्या बाळाच्या जन्मावर ५०००, दुसऱ्यावेळी मुलगी झाली तर मिळतील ६ हजार रुपये; काय आहे सरकारची योजना?

शिक्षक भरती घोटाळ्याच्या चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या एसआयटीमध्ये कोण कोण आहे. याची लवकरच माहिती समोर येणार आहे. यात कोणावरही अन्याय होणार नाही. शिक्षण विभाग म्हणून आमची ते जबाबदारी आहे. जो कोणी निरप्राध आहे. त्यांच्यावर अन्याय होणार नाही. चुकीच्या काम बिलकुल होणार नाही. परंतु चौकशीमध्ये जो कोणी दोषी आढळून आला त्याच्यावर कारवाई होणार असल्याचे दादा भुसे यांनी सांगितलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com