Sakshi Sunil Jadhav
आपल्याला आज फलदायी ठरेल. मनासारख्या घटना घडतील. लांबचे प्रवास होतील.
अडचणींचा सामना करावा लागेल. पण त्याचबरोबर केलेल्या कष्टातून धनप्राप्ती उत्तम होणार आहे.
विनाकारण मागे लागलेल्या काही कटकटीतून आज मार्ग निघणार आहे. कोर्टकचेरी असो कुठेतरी वाद विवाद असो.
आपण करत असलेल्या गोष्टींवर विशेष लक्ष केंद्रित करा. भावनिकता टाळून आपले कोण आणि परके कोण हे आज ओळखा.
नवनवीन गोष्टी करायला आपल्याला कायमच आवडते.आज आपली सृजनशीलता वाढणार आहे.
पुस्तकांची निगडित विशेष आकर्षण वाढेल. नव्याने खरेदी पुस्तकांसाठी होईल.घरामध्ये काही बदल आज घडणार आहेत.
अडचणीच्या काळी आपलेच लोक सांभाळून घेतात. आज शेजाऱ्यांचे विशेष सहकार्य लाभेल.
अनेक गोष्टी एकट्याने करताना होणारी तारांबळ आपल्या कुटुंबीयांना बघणार नाही. त्यांच्या मदतीने आज तुम्ही पुढे जाल.
एखादा निर्णय घेताना आज दोलायमान होण्याची नक्कीच शक्यता आहे. आपला प्रभाव इतरांवर पडेल आणि अभाव निघून जाईल .
नको असलेल्या गोष्टी काढून टाकण्याचा आजचा दिवस आहेत. खर्चाचे व्यवस्थापन नीट करावे.
जुने मित्र-मैत्रिणी यांच्या गाठीभेटी होतील. त्यांच्या आठवणीमध्ये रमाल. दिवस मनासारखा जाईल.
आपण इतरांचे केले की देव आपले करतो ही भावना आपली अगदी दृढ आहे.सामाजिक उपक्रमात विशेष सहभाग घ्याल.