Sakshi Sunil Jadhav
गुरु चाणक्य हे राजनिती तज्ज्ञ असले तरी त्यांनी प्रत्येक गोष्टीवर विचार करुन काही संदेश दिले आहेत.
चाणक्यांच्या मते, सुखी संसारासाठी काही गोष्टींचे नियम पाळणे महत्वाचे आहे.
सगळ्यात आधी नात्यात नवरा-बायकोने एकमेकांशी गोड बोलणे आणि वागण्यात समजूतदारपणा ठेवणे महत्वाचे आहे.
नातं प्रेमाने सुरु होतं मात्र त्याचा शेवट प्रेमाने होत नाही.
जर एखाद्या नात्यात समजूतदारपणा असेल तर त्या नात्याचा शेवट होऊ शकत नाही.
जी व्यक्ती स्वत:चे म्हणणे खरे मानते आणि दुसऱ्याचे खोट्यात पाडते. अशी व्यक्ती संसार टिकवू शकत नाही.
नात्यात एकमेकांच्या प्रगतीवर कधीही जळू नये. त्याने मनात प्रचंड राग निर्माण होतो.
कोणत्याही नात्यात प्रेम असणे महत्वाचे आहे.