indian football legend sunil chhetri announces retirement from football emotional video viral amd2000 twitter
Sports

Sunil Chhetri Retirement : अलविदा कॅप्टन! सुनील छेत्रीचा फुटबॉलला रामराम; भावुक करणारा Video शेअर करत निवृत्तीची घोषणा

Sunil Chhetri's Retirement from Indian Football : भारताचा स्टार फुटबॉलपटू आणि कर्णधार सुनील छेत्रीने क्रिकेटला राम राम करण्याचा निर्णय घेतला आहे.

Ankush Dhavre

भारताचा स्टार फुटबॉलपटू आणि कर्णधार सुनील छेत्रीने क्रिकेटला राम राम करण्याचा निर्णय घेतला आहे. आपली १९ वर्षांच्या फुटबॉल कारकिर्दीला त्याने अखेर पूर्णविराम दिला आहे. आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर व्हिडिओ शेअर करत त्याने निवृत्तीची घोषणा केली आहे. (Sunil Chhetri Retirement)

सुनील छेत्रीने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून १० मिनिटांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्या व्हिडिओमध्ये त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तो म्हणाला की, येत्या ६ जून रोजी भारतीय संघ कुवेतविरुद्ध पात्रता फेरीतील सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. हा त्याच्या आंतरराष्ट्रीय फुटबॉल कारकिर्दीतील शेवटचा सामना असेल. भारताचा कर्णधार म्हणून त्याने भारतीय फुटबॉलला एका उंचीवर नेऊन ठेवलं आहे.

सुनील छेत्री हा भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार आणि यशस्वी फुटबॉलपटू देखील आहे. भारतीय संघासाठी खेळताना त्याने १५० सामन्यांमध्ये ९४ गोल केले. निवृत्ती जाहीर करताना त्याने एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये त्याने आपल्या कारकिर्दीतील काही आठवणी सांगितल्या आहेत. तो म्हणाला की, ' मला माझा पहिला सामना अजूनही आठवतो, माझा पहिला गोल हा माझ्या प्रवासातील एक अविस्मरणीय क्षण होता. मी भारतासाठी इतके सामने खेळू शकेल असं मला कधीच वाटलं नव्हतं.'

या व्हिडिओत तो पुढे म्हणाला की, ' हा निर्णय घेतल्यानंतर आधी मी हा निर्णय माझ्या आई - वडिलांना आणि माझ्या पत्नीला सांगितला. माझ्या वडिलांना आनंद झाला. पण माझ्या पत्नी आणि आईला रडू कोसळलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : शिंदेसेनेला हादरा, नाराज नेता भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत

Horoscope Monday : सोमवार ठरणार भाग्याचा, रखडलेली कामे होणार पूर्ण; वाचा राशीभविष्य

Vastu Tips For Luck: चांगले दिवस येण्यापूर्वी दिसतात 'हे' शुभ संकेत

Garlic Benefits : लसूण खाण्याची योग्य पद्धत आणि जबरदस्त फायदे

Anna Hazare:'अण्णा आता तरी उठा'! ... मग तुम्ही झोपून राहणार का? बॅनरबाजीवर अण्णा हजारे भडकले

SCROLL FOR NEXT