Ankush Dhavre
भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री हा सर्वात लोकप्रिय खेळाडूंपैकी एक आहे.
त्याने भारतीय संघाला अनेक जेतेपदे जिंकून दिली आहेत.
त्याची लव्ह स्टोरी ही एका फिल्मी लव्ह स्टोरीपेक्षा कमी नाही
सुनील छेत्रीची पत्नी सोनम भट्टाचार्य अनेकदा भारतीय संघाला सपोर्ट करण्यासाठी मैदानात आल्याचे पाहायला मिळाले आहे.
दोघेही २०१७ मध्ये विवाह बंधनात अडकले होते.
सोनम ही सुनील छेत्री याचे प्रशिक्षक सुब्रतो भट्टाचार्य यांची मुलगी आहे. सुनील छेत्री एकेकाळी सुब्रतो भट्टाचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली मोहन बागानमध्ये खेळत होता.
सोनमने वडिलांच्या मोबाइलमधून सुनीलचा नंबर चोरुन घेतला होता. त्यानंतर तिने त्याला मेसेज करत, मी तुझी खूप मोठी चाहती असून, मला तुला भेटण्याची इच्छा आहे असं म्हटलं होतं. त्यावेळी ही मुलगी कोण आहे याची सुनील छेत्रीला कल्पना नव्हती.
दोघांनी १३ वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर विवाह करण्याचा निर्णय घेतला होता.