Movies On Cricketers Life: भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंगच्या आयुष्यावर लवकरच चित्रपट येणार आहे. भारतीय क्रिकेटमधील या खऱ्या फायटरचा प्रवास आता मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.
भारताला २००७ टी-२० वर्ल्डकप आणि २०११ वनडे वर्ल्डकप जिंकून देण्यात युवराज सिंगने मोलाची भूमिका बजावली होती. क्रिकेटच्या मैदानावर देशासाठी लढत असताना, तो आपल्या आयुष्याशी झुंज देत होता. त्याला बालपणीपासून ते आतापर्यंतचा प्रवास या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.
युवराज सिंगच्या भूमिकेत कोण असणार, हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही. मात्र युवीचा प्रवास पाहण्यासाठी प्रेक्षक सिनेमाघरात तुफान गर्दी करतील हे नक्की. दरम्यान युवराज सिंगच्या आयुष्यावर चित्रपट येण्यापूर्वी, अनेक खेळाडू होऊन गेले ज्यांच्या आयुष्यावर चित्रपट काढण्यात आले आहेत.
हा चित्रपट भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीच्या आयुष्यावर आधारीत आहे. या चित्रपटात धोनीच्या बालपणीपासून ते वर्ल्डकप २०११ फायनलपर्यंतचा प्रवास दाखवण्यात आला आहे.
भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरच्या आयुष्यावर आधारीत हा चित्रपट २०१७ मध्ये प्रदर्शित करण्यात आला होता.
अजहर हा चित्रपट भारताचे माजी कर्णधार मोहम्मद अजहरुद्दीन यांच्या आयुष्यावर आधारीत आहे. या चित्रपटात त्यांचा प्रवास दाखवण्यात आलेला आहे. यासह त्यांनी मिळवलेलं यश आणि वादग्रस्त प्रसंग यांचंही चित्रीकरण करण्यात आलं आहे.
भाग मिल्खा भाग या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली होती. हा चित्रपट फ्लाईंग सीख म्हणून ओळखले जाणारे माजी धावपटू मिल्खा सिंग यांच्या आयु्ष्यावर आधारीत होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.