ruturaj gaikwad and utkarsha pawar instagram
क्रीडा

Ruturaj Gaikwad Marriage: 'साजिरी गोजिरी जोडी आहे ही जबर' ऋतुराज - उत्कर्षाच्या मेहंदी सेरेमनीतील फोटो व्हायरल -PHOTO

Ruturaj Gaikwad Mehendi Ceremony: लवकरच तो आपल्या नव्या आयुष्याची सुरुवात करणार आहे.

Ankush Dhavre

Ruturaj Gaikwad- Utkarsha Pawar: आयपीएल २०२३ स्पर्धेतील अंतिम सामना नुकताच पार पडला. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स हे दोन्ही संघ आमने सामने आले होते.

या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाने जोरदार कामगिरी करत पाचव्यांदा जेतेपदाला गवसणी घातली आहे.

या स्पर्धेत सलामीवीर ऋतुराज गायकवाडने चेन्नई सुपर किंग्ज संघासाठी जोरदार कामगिरी केली आहे. लवकरच तो आपल्या नव्या आयुष्याची सुरुवात करणार आहे.

मेहंदी सेरेमनीचे फोटो व्हायरल..

चेन्नईचा स्टार फलंदाज ऋतुराज गायकवाड आपल्या नव्या इनिंगची सुरुवात करतोय. भल्याभल्या गोलंदाजांकडून बाद न होणाऱ्या ऋतुराज महाराष्ट्राच्या महिला संघातील गोलंदाजाने क्लीनबोल्ड केलं आहे.

उद्या म्हणजे ३ जून रोजी तो उत्कर्षा पवारसोबत विवाह बंधनात अडकणार आहे. या दोघांच्या मेहंदी सेरेमनीतील फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. या फोटोमध्ये दोघांनी मेहंदी लावल्याचं दिसून येत आहे.

कोण आहे ऋतुराजची होणारी बायको?

ऋतुराज गायकवाडच्या होणाऱ्या बायकोचं नाव उत्कर्षा पवार असं आहे. ऋतुराज गायकवाड प्रमाणेच ती देखील एक क्रिकेटपटू आहे. ती देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करते.

ऋतुराज गायकवाड फलंदाज तर उत्कर्षा पवार अष्टपैलू खेळाडू आहे. उत्कर्षा देखील पुण्यात राहते. ऋतुराज गायवाकडचा आयपीएल स्पर्धेतील ५० वा सामना पाहण्यासाठी उत्कर्षा गायकवाडने देखील चेन्नईच्या मैदानावर हजेरी लावली होती.

हा फोटो व्हायरल होताच, दोघांमध्ये काहीतरी सुरु असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. तसेच आयपीएल स्पर्धेची ट्रॉफी जिंकल्यानंतर ऋतुराज गायकवाड आणि उत्कर्षाने आयपीएलच्या ट्रॉफीसोबत फोटो शेअर केला होता. (Latest sports updates)

ऋतुराज गायकवाडने लग्नासाठी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम सामन्यातून माघार घेतली आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणाऱ्या सामन्यात त्याला राखीव फलंदाज म्ह्णून संधी दिली गेली होती.

मात्र ३ जून रोजी लग्न ठरल्याने त्याने या स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्या ऐवजी यशस्वी जयस्वालला संधी दिली गेली आहे. हा सामना ७ ते ११ जून दरम्यान लंडनमधील ओव्हलच्या मैदानावर पार पडणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

kiwi Benefits: किवी फळाचे असंख्य फायदे!

VIDEO : पावसात सभा झाल्यावर निवडून येतात; भाषणावेळी पाऊस आला, फडणवीसांचा शरद पवारांना टोला

Champions Trophy: टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानात जाण्यास नकार का दिलाय? समोर आलं खरं कारण

Kalyan News : कल्याण-डोंबिवलीत ४० जण तडीपार; ऐन निवडणुकीत पोलिसांची धडक कारवाई

Electric Vehicle: इलेक्ट्रिक वाहनेच का घ्यावीत, भविष्याच्या दृष्टीने काय आहे फायदा?

SCROLL FOR NEXT