Retirement news saam tv
Sports

Retirement news: 17 वर्षांची कारकिर्द, वनडेत 2 हजारांपेक्षा जास्त रन्स...! भारतीय खेळाडूची निवृत्तीची घोषणा

India women cricket team: भारतीय महिला क्रिकेटपटू पूनम राऊतने वयाच्या ३७ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. २०१७ च्या महिला विश्वचषकातील तिची कामगिरी विशेष ठरली. तिने भारताकडून चार कसोटी, ७३ वनडे आणि ३५ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले.

Surabhi Jayashree Jagdish

भारतीय महिला क्रिकेट टीमची फलंदाज पूनम राऊत हिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलीये. गुरुवारी सोशल मीडियावर पोस्ट करत तिने हा निर्णय सांगितला. पूनमने टेस्ट, वनडे आणि टी-२० अशा तिन्ही प्रकारांत भारताचं प्रतिनिधित्व केलंय. मात्र २०२१ नंतर तिला टीम इंडियामध्ये खेळण्याची संधी मिळाली नव्हती. ऑक्टोबर २०२१ मध्ये तिने भारताकडून शेवटचा सामना खेळला होता.

पूनमने २००९ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. देशांतर्गत क्रिकेटमध्ये ती मुंबईच्या टीमकडून खेळत होती. वयाच्या ३७ व्या वर्षी तिने तिच्या दहा वर्षांहून अधिक काळ चाललेल्या क्रिकेट कारकिर्दीला पूर्णविराम दिलाय.

२०१७ च्या महिला वर्ल्डकपमध्ये पूनमने आपल्या फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतलंय. या स्पर्धेत तिने एकूण ३८१ रन्स केले होते. यामध्ये इंग्लंडविरुद्ध लॉर्ड्स मैदानावर झालेल्या अंतिम सामन्यात केलेल्या ८६ रन्सचाही समावेश होता. तिच्या या खेळीमुळे त्या वर्ल्डकपमधील तिच्या कामगिरीची विशेष चर्चा झाली होती.

काय म्हणाली पूनम राऊत?

निवृत्तीची घोषणा करताना पूनमने सोशल मीडियावर त्याच्या क्रिकेट प्रवासाबद्दल भावना व्यक्त केल्या. मुंबईच्या रस्त्यांपासून ते भारतीय टीमची जर्सी घालण्यापर्यंतचा प्रवास एखाद्या आशीर्वादासारखा असल्याचं तिने म्हटलंय.

या प्रवासात अनेक त्याग करावे लागले, संघर्ष करावा लागला आणि अनेक अविस्मरणीय विजय अनुभवायला मिळाले, असंही तिने म्हटलंय. या काळात मिळालेले कठीण धडे आणि आठवणी आयुष्यभर जपून ठेवणार असल्याचं पूनमने तिच्या पोस्टमध्ये लिहिलंय.

भारताकडून खेळणं हे केवळ एक स्वप्न पूर्ण होण्यासारखं नव्हतं तर मोठ्या अभिमानाने पार पाडलेली जबाबदारी होती, असंही तिने नमूद केलंय. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील या प्रवासाचा शेवट करताना तिच्या मनात कृतज्ञतेची भावना असल्याचं तिने सांगितलंय. तिच्यावर विश्वास ठेवणाऱ्या, तिला साथ देणाऱ्या आणि या प्रवासाचा भाग बनलेल्या सर्वांचे पूनमने आभार मानलेत.

पूनम राऊतची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कामगिरी

पूनम राऊतने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत भारताकडून एकूण ४ कसोटी, ७३ एकदिवसीय आणि ३५ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले.

  • टेस्ट क्रिकेट- पूनमने ४ कसोटी सामने खेळले आणि यामध्ये ७ डावांत तिने २६४ रन्स केलेत.

  • वनडे क्रिकेट- ७३ वनडे सामन्यांतील ७३ डावांत तिने एकूण २,२९९ रन्स केलेत.

  • टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट- ३५ सामन्यांत तिने ३१ डाव खेळले आणि ७१९ रन्स केलेत.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दहा वर्षांहून अधिक काळ भारताचं प्रतिनिधित्व केल्यानंतर पूनमने आता तिच्या क्रिकेट कारकिर्दीचा हा अध्याय संपवलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: हदगावमध्ये बोगस डॉक्टरला अटक, आरोग्य विभागाने धाड टाकून केली कारवाई

School Teachers: राज्यातील शिक्षकांचा मोठा निर्णय, 1 डिसेंबरपासून ऑनलाईन कामांवर टाकणार बहिष्कार

Akola : नगरपरिषद व नगरपंचायतींमध्ये १०३ पदांची भरती; ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू; कसा कराल अर्ज? वाचा

Eetha movie: श्रद्धा कपूरच्या 'ईठा' चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच रचला इतिहास; 'जी जी रे जी' गाण्याची आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद

Water Shortage : ठाणे महापालिकेचा भोंगळ कारभार! पाणी नसल्याने डायलिसिस थांबवले; ७ रुग्णांना उपचाराविनाच पाठवले घरी

SCROLL FOR NEXT