KL Rahul Wedding Saam Tv
Sports

KL Rahul Wedding : केएल राहुलच्या लग्नाची तारीख ठरली; बीसीसीआयच्या एका ट्विटने सोशल मीडियावर चर्चा

भारतीय फलंदाज केएल राहुल लवकरच अभिनेत्री अथिया शेट्टीसोबत लग्न बंधनात अडकणार आहे.

Vishal Gangurde

KL Rahul News : भारतीय फलंदाज केएल राहुल लवकरच अभिनेत्री अथिया शेट्टीसोबत लग्न बंधनात अडकणार आहे. काही मीडिया रिपोर्टमधून दावा केला जात आहे, दोघं २३ जानेवारी रोजी लग्न करणार आहे. (Latest Marathi News)

२३ जानेवारी रोजी टीम इंडिया न्यूझीलँडविरोधात मालिका खेळत असेल. मात्र, न्यूझीलँड विरुद्ध टीम इंडियाच्या संघात केएल राहुल नसणार. त्याने बीसीसीआयला कौटुंबिक कारण देत सुटी मागणी आहे.

बीसीसीआयने देखील ट्विट करत माहिती दिली होती. यामुळे केएल राहुलच्या (KL Rahul) लग्नाच्या वृत्तावरून सोशल मीडियावर चर्चाला उधाण आलं आहे.

काही रिपोर्टमधून दावा केला जात आहे की, केएल राहुल आणि अथियाचं (Athiya Shetty) लग्न सुनील शेट्टीच्या खंडाळा येथील बंगल्यात होईल. अथिया सुनिल शेट्टीची एकुलती एक लेक आहे. सुनील शेट्टीने गेल्या वर्षीच मुलीचे लवकरच लग्न करणार असल्याचे सांगितले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, अथिया शेट्टी आणि केएल राहुल लग्नानंतर मुंबईच्या वांद्रे येथील घरात राहणार आहे. वांद्रे येथील कार्टर रोड जवळील एका अपार्टमेंटमध्ये सी-फेस 4 बीएचके प्लॅट असणार आहे. याचे महिन्याचे भाडे १० लाख रुपये असणार आहे.

केएल राहुल आणि अथिया शेट्टी हे गेल्या तीन वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. अथिया आयपीएल आणि टीम इंडियाच्या सामन्यात केएल राहुलला चिअर्स करताना दिसायची. राहुलची जर्मनीत शस्त्रक्रिया झाली, तेव्हा त्याच्यासोबत अथिया देखील होती. दोघे जोडीने सोशल मीडियावर फोटो शेअर करताना दिसतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मराठी-हिंदी वादात ब्रिजभूषण सिंहांची उडी,ठाकरेंना थेट धमकी

गौरवास्पद! UNESCO च्या यादीत पुण्यातील तीन किल्ल्यांचा समावेश | VIDEO

Government Scheme : मुलांसाठी सरकारची नवी योजना? मुलांना महिन्याला 3 हजार?

Sleeping Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार झोपण्याची योग्य दिशा कोणती?

Phone Charging: फोन चार्ज करताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा आग लागू शकते

SCROLL FOR NEXT