Rahul Dravid News : राहुल द्रविडचं विमानानं बेंगळुरूला उड्डाण; प्रकृती बिघडल्याचे वृत्त

भारतानं श्रीलंकेवर विजय मिळवून मालिकाही जिंकली. या सामन्यादरम्यान द्रविडची प्रकृती बिघडली होती. परंतु तो संघासोबतच राहिला होता.
Rahul Dravid
Rahul Dravid Saam TV

Rahul Dravid News : टीम इंडियाच्या चमूतून महत्वाची बातमी समोर येत आहे. संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड अचानक विमानाने बेंगळुरूला रवाना झाले. त्यांची प्रकृती बिघडल्याने ते बेंगळुरूला परतले आहेत, असे वृत्त आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, कोलकाता येथे भारत आणि श्रीलंका यांच्यात दुसरा सामना झाला. यात भारतानं श्रीलंकेवर विजय मिळवून मालिकाही जिंकली. या सामन्यादरम्यान द्रविडची प्रकृती बिघडली होती. परंतु तो संघासोबतच राहिला होता.

आता श्रीलंकाविरुद्ध तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना तिरुवअनंतपुरमला होणार आहे. या सामन्यासाठी उर्वरित संघ सहकारी रवाना होणार आहेत. (Sports News)

Rahul Dravid
Women Cricketer Death: धक्कादायक! महिला क्रिकेटपटूच्या संशयास्पद मृत्यूने क्रिडा जगतात खळबळ; कुटूंबियांचे गंभीर आरोप

विमानातील फोटो व्हायरल

बेंगळुरूला जाणार्‍या विमानातील द्रविडचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यामुळे द्रविड अचानक बेंगळुरूला का गेला , अशी चर्चा सुरू झाली होती. मात्र मीडिया रिपोर्टनुसार, द्रविडची तब्येत बरी नसल्याने तो बेंगळुरूला गेल्याचे सांगण्यात येत आहे.

तत्पूर्वी, भारताने दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेवर मात केली. एकवेळ संघाची स्थिती ४ बाद ८६ होती. पण राहुल आणि हार्दिकने डाव सावरला. अखेर ४ गडी राखून भारताने विजय मिळवला. या विजयासह मालिकाही जिंकली.

Rahul Dravid
Viral Video: लाईव्ह मॅच अन् राहुल द्रविडला Screen वर दिसले त्याचेच रेकॉर्ड; Reaction पाहाल तर थक्क व्हाल

लोकेश राहुलने १०३ चेंडूंचा सामना करत नाबाद ६४ धावा करत भारताला विजयाकडे नेले. कुलदीप यादवने ४४व्या षटकात विजयी चौकार मारला.

तिरुवनंतपुरम येथे रविवारी होणार्‍या शेवटच्या एकदिवसीय सामन्यात विजय मिळवण्याच्या इराद्याने टीम इंडिया मैदानात उतरेल, तर श्रीलंका या सामन्यात विजय मिळवून मालिकेचा शेवट गोड करण्याचा प्रयत्न करेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com