Siddhi Hande
शरीरात व्हिटॅमिन डी असणे खूप जास्त गरजेचे आहे. सर्वाधिक व्हिटॅमिन सूर्यप्रकाशामुळे मिळते.
शरीरात जर व्हिटॅमिन डीची कमी असेल तर अनेक आजार होऊ शकतात.
लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांमध्ये व्हिटॅमिन डीची कमतरता जाणवते.
जर तुम्ही सकाळी कोवळ्या उन्हात गेला नाही, फळे खाल्ली नाही तर तुमच्या शरीरात व्हिटॅमिन डीची कमी होऊ शकते.
व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे हाडे, स्नायू कमकूवत होणे, थकवा येतो.
काही लोकांना हातापायांमध्ये मुंग्या येतात. तसेच तुम्ही जर कुठे पडलात तर लगेचच हाडं फ्रॅक्चर होऊ शकते.
पोषक आहार न मिळणे, उन्हात न जाणे तसेच मूत्रपिंड किंवा यकृताचे आजार असेल तर तुमच्या शहरात व्हिटॅमिन डीची कमी असू शकते.
रोज कोवळ्या उन्हात जाऊन बसायला हवे, जेणेकरुन व्हिटॅमिन डीची कमी भासणार नाही.
सदर माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. साम टीव्ही याचे समर्थन करत नाही.