jitesh sharma instagram
Sports

Jitesh Sharma Engagement: टीम इंडियाचा स्टार जितेश शर्माने उरकला साखरपुडा! होणारी बायको आहे तरी कोण?

Jitesh Sharma Wife: भारतीय संघाचा स्टार खेळाडू जितेश शर्माने साखरपुडा उरकला आहे. त्याच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Ankush Dhavre

भारतीय संघातील स्टार फलंदाज आणि आयपीएल स्पर्धेत पंजाब किंग्ज संघाकडून खेळणाऱ्या जितेश शर्माने नुकताच साखरपुडा केला आहे. भारतीय संघातील या यष्टीरक्षक फलंदाजाने साखरपुडा झाल्याची बातमी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट शेअर करत दिली आहे. जितेश शर्माच्या होणाऱ्या पत्नीचं नाव शालका असं आहे. त्याने दोघांचे फोटो शेअर करत हटके कॅप्शनही दिलं आहे.

भारतीय खेळाडूंनी दिल्या शुभेच्छा

जितेश शर्माने कपल फोटो इंस्टाग्रामवर अपलोड करताच, फॅन्ससह भारतीय खेळाडूंनी त्याला शुभेच्छा द्यायला सुरुवात केली आहे. भारतीय टी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने त्याला कमेंट करत शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने लिहिले की, ' भाऊ आणि वहिनी तुम्हा दोघांनाही शुभेच्छा.' तर मराठमोळ्य ऋतुराज गायकवाडनेही कमेंट करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने, 'शादीशुदा क्लबमध्ये एन्ट्री.' असं लिहिलं आहे. यासह मोहसिन खान, वॉशिंग्टन सुंदर आणि पंजाब किंग्ज संघाचे माजी प्रशिक्षक वसीम जाफरनेही कमेंट करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

जितेश शर्माची पत्नी आहे तरी कोण?

जितेश शर्माच्या होणाऱ्या पत्नीचं नाव शालका मकेश्वर असं आहे.माध्यमातील वृत्तानुसार, शालकाने प्रो राम मेघे कॉलेज ऑफ इंजिनियरिंग अँड मॅनेजमेंट कॉलेजमधून इलेक्ट्रॉनिक्स अँड टेली कम्युनिकेशन इंजिनियरिंगमध्ये B.E. केलं आहे. यासह तिने यशवंतवराव चव्हाण कॉलेज ऑफ इंजियरिंगमधून VLSI डिजाईनमधून M.Tech केलं आहे. सध्या ती एका सॉफ्टवेअर कंपनीत, सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून काम करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Reshma Shinde: माझ्या नयनी नक्षत्र तारा आणि चांद तुझ्या डोळ्यात...

Ambajogai News : स्मशानभूमी नसल्याने मृतदेह ठेवला नगरपरिषद कार्यालयाबाहेर; अंबाजोगाईत लिंगायत समाज आक्रमक

Ind vs Eng : पराभवाच्या छायेत असणाऱ्या टीम इंडियाचा खुशखबर! इंग्लंडचा स्टार खेळाडू दुखापतग्रस्त

Maharashtra Live News Update: “सुवर्णकारांसाठी धोरणात्मक पाठबळ सरकार देईल” – विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांची ग्वाही

Nag Panchami 2025: नाग पंचमीला किचन मधील या वस्तू वापरू नका, नाहीतर...

SCROLL FOR NEXT