jay shah,pakistan cricket team yandex
क्रीडा

Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया पाकिस्तानात जाणार नाही! या 2 देशात होऊ शकतात सामने

Ankush Dhavre

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेचा थरार पाकिस्तानात रंगणार आहे. या स्पर्धेसाठी पाकिस्तानने आतापासूनच जोरदार तयारी सुरु केली आहे. या स्पर्धेसाठी इतर सर्व पाकिस्तानात जाण्यासाठी तयार आहेत. मात्र भारतीय संघ पाकिस्तानात खेळण्यासाठी जाणार की नाही? यावर सर्वांचं लक्ष लागुन आहे. भारतीय संघ पाकिस्तानात खेळण्यासाठी जाणार की नाही, यावर बीसीसीआयकडून कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. दरम्यान माध्यमातील वृत्तांमध्ये असा दावा केला जात आहे की, भारतीय संघ ही स्पर्धा खेळण्यासाठी पाकिस्तानात जाणार नाही.

एएनआयच्या वृत्तानुसार, भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेसाठी पाकिस्तानात जाण्याची शक्यता खूप कमी आहे. बीसीसीआयच्या सुत्राने दिलेल्या माहितीनुसार, बीसीसीआय आयसीसीकडे भारतीय संघाचे सामने श्रीलंकेत किंवा दुबईत खेळवण्याची मागणी करु शकते. यापूर्वी आशिया चषक स्पर्धेचे यजमानपदही पाकिस्तानकडे होते. मात्र भारतीय संघाने पाकिस्तानात जाऊन खेळण्यास नकार दिला होता. त्यामुळे भारतीय संघाचे सर्व सामने आणि फायनलचा सामनाही श्रीलंकेत खेळवण्याता आला होता.

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डने या स्पर्धेसाठी जोरदार तयारी देखील सुरु केली आहे. ही स्पर्धा पाहता, पाकिस्तान क्रिकेट बोर्डने रावलपिंडी आणि लाहोरमध्ये असलेल्या स्टेडियमचं नुतनीकरण करायला सुरुवात केली आहे. मात्र भारतीय संघाचे सामने जर दुबई किंवा श्रीलंकेत आयोजित केले गेले,तर पाकिस्तान क्रिकेट बोर्डला आर्थिक फटकाही बसू शकतो.

पाकिस्तानला १९९६ नंतर पहिल्यांदाच आयसीसीच्या स्पर्धेचं यजमानपद मिळालं आहे. त्यानंतर आशिया चषक २००८ स्पर्धेतील सामने पाकिस्तानात खेळवले गेले होते. २०२३ मध्ये झालेल्या आशिया चषक स्पर्धेतील काही सामनेही पाकिस्तानात खेळवले गेले होते. दरम्यान बीसीसीआय काय निर्णय घेणार? हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Smell Free Shoes Tips : बुटांचा खराब वास येत आहे? या टिप्सने दुर्गंधी होईल मिनिटांत छुमंतर

Sanjay Raut Video : मुख्यमंत्रीपदावरून मविआमध्ये वाद? राऊत काँग्रेसवर भडकले !

PM Vishwakarma Yojana: वर्षभरात ६ लाख लाभार्थी, २ कोटींपेक्षा जास्त लोकांनी केलेय रजिस्ट्रेशन, योजनेचा कसा घ्याल लाभ?

Maharashtra News Live Updates: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील वाद चव्हाट्यावर

CIDCO Lottery 2024: गुड न्यूज! म्हाडापाठोपाठ सिडकोच्या घरांच्या किमती १० टक्क्यांनी कमी होणार?

SCROLL FOR NEXT