Indian Cricket Team Player saam tv news
क्रीडा

Indian Cricket Team Player : टीम इंडियाच्या स्टार खेळाडूचा भाजपमध्ये प्रवेश; टी२० विश्वचषक जिंकवण्यात मोलाचा वाटा

Indian Cricket Team Player ravindra jadeja : टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर रविंद्र जडेजाने भाजपमध्ये प्रवेश केला आहे. रविंद्रने भाजपचं पक्षाचं प्राथमिक सदस्यत्व घेतलं आहे. रविंद्रची पत्नी आधीपासून भाजपमध्ये आहेत.

Vishal Gangurde

नवी दिल्ली : टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर रविंद्र जडेजाच्या चाहत्यांसाठी महत्वाची बातमी हाती आली आहे. रविंद्र जडेजाने क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर राजकारणात करिअर करण्यास सज्ज झाला आहे. जडेजाने भाजपमध्ये प्रवेश केला आहे. रविंद्र जडेजाने भाजपचं पक्षाचं सदस्यत्व घेतलं आहे. जडेजाच्या भाजप प्रवेशाविषयी त्याच्या पत्नीने सोशल मीडियावर माहिती दिली आहे.

रविंद्र जडेजाची पत्नी आधीच भाजपमध्ये आहेत. जडेजाची पत्नी गुजरातच्या जामनगर उत्तर मतदारसंघातील आमदार आहेत. टीम इंजियाचा स्टार खेळाडू रविंद्र जडेजाने भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. त्याची पत्नी रिवाबा यांनी सोशल मीडियावर त्यांचे पती रविंद्र जडेजाने भाजपमध्ये प्रवेश केल्याची माहिती सांगितली.

जडेजाने निवडणुकीत केला बायकोचा प्रचार

रविंद्र जडेजाची पत्नी रिवाबा आधीपासून भाजपमध्ये आहेत. त्या गुजरातमधील जामनगर उत्तर या मतदारसंघातून आमदार आहेत. विधानसभा निवडणुकीवेळी जडेजाने बायकोसाठी प्रचार केला. रविंद्र जडेजा निवडणुकीत बायकोच्या प्रचारासाठी रोड शोमध्ये सहभाग दर्शवला होता. आता जडेजा भाजपमध्ये प्रवेश करत नव्याने राजकारणात करिअर करण्यास तयार झाला आहे. रविंद्र जडेजाने त्याच्या राजकीय प्रवेशाविषयी अद्याप कोणतंही भाष्य केलेलं नाही.

२०२९ मध्ये रिवाबा यांनी केला भाजपमध्ये प्रवेश

रविंद्र जडेजाची पत्नी रिवाबा यांनी २०१९ साली भाजपमध्ये प्रवेश केला होता. यानंतर जडेजाची पत्नी रिवाबा यांनी भाजपकडून २०२२ साली झालेल्या गुजरात विधानसा निवडणुकीत जामनगर मतदारसंघातून मैदानात उतरल्या होत्या. या निवडणुकीत त्यांनी करशनभाई करमूर यांना धूळ चारली होती.

जडेजाने टी२० क्रिकेटमधून घेतली निवृत्ती

टी२० वर्ल्ड कप २०२४ झाल्यानंतर रविंद्र जडेजाने टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यातून निवृत्ती घेतली होती. जडेजाने भारतासाठी ७४ टी२० सामने खेळले आहेत. तर त्याने ५१५ धावा कुटल्या आहेत. या व्यतिरिक्त जडेजाने ५४ विकेट घेतले आहेत. टी२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर तो वनडे आणि कसोटी सामन्यात खेळणार आहे. काही दिवसांपूर्वीच रवींद्र जडेजाने दिलीप ट्रॉफीतून स्वत:चं नाव मागे घेतले होते. त्याने या दिलीप ट्रॉफी स्पर्धेतून नाव मागे घेण्याचे स्पष्टीकरण दिलेलं नाही. मात्र, वैयक्तिक कारणामुळे त्याने नाव मागे घेतल्याचं बोललं जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Exit Poll Maharashtra : बीडमध्ये शरद पवार की अजित पवार? कोणाचा उमेदवार मारणार बाजी? पाहा VIDEO

Bigg Boss 18: 'मेरी मर्जी...' म्हणत विवियन अन् अविनाशने घरात घातला धुमाकूळ, 'टाइम गॉड' दिग्विजयच्या तोंडचे पाणी पळाले

Sangli News : शाळगाव एमआयडीसीत कंपनीमध्ये वायू गळती; दोन महिलांचा मृत्यू

Maharashtra Exit Poll: दिंडोरीमधून अजित पवार गटाचे नरहरी झिरवाळ होणार आमदार? पाहा Exit Poll

Dahisar Exit Poll : दहिसर विधानसभा मतदारसंघाचे संभाव्य आमदार कोण? घोसळकर भाजपला धक्का देणार का?

SCROLL FOR NEXT