Indian cricket team saam tv
क्रीडा

Team India FTP 2023 : 'असा' आहे टीम इंडियाचा पुढील पाच वर्षांचा शेड्युल, वाचा सविस्तर माहिती

भारतीय क्रिकेट संघाचा पुढील पाच वर्षांचा संपूर्ण शेड्युल जाहीर करण्यात आला आहे.

नरेश शेंडे

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा (Indian Cricket Team) पुढील पाच वर्षांचा संपूर्ण शेड्युल जाहीर करण्यात आला आहे. २०२३ पासून २०२७ दरम्यान एकूण १३८ द्विपक्षीय आंतरराष्ट्रीय सामने होणार आहेत. भारतीय क्रिकेट संघ आयसीसीने (ICC) दिलेल्या कार्यक्रमानूसार (एफटीपी ) पुढील पाच वर्षात ३८ टेस्ट, ३९ वनडे, आणि ६१ टी-२० सामने खेळणार आहे. यामध्ये पाकिस्तानच्या विरोधात कोणतीही द्विपक्षीय श्रृंखला खेळवली जाणार नाही.

याचदरम्यान, १२ सदस्य देश ७७७ आंतरराष्ट्रीय सामने खेळणार आहेत. यामध्ये १७३ टेस्ट, २८१ वनडे आणि ३२३ टी-२० सामन्यांचा समावेश आहे. या सत्रात संघांनी ६९४ सामने खेळले आहेत. यात आयसीसीचे दोन पुरुष टेस्ट चॅम्पियनशिप, आयसीसी टुर्नामेंट आणि द्विपक्षीय तसेच तीन देशांच्या लढतींचा समावेश आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया मध्ये होणारी बॉर्डर गावस्कर ट्रॉफी चार सामन्यांच्या ऐवजी पाच सामन्यांची खेळवली जाणार आहे.

भारतीय संघ इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया दोघांच्या विरुद्ध पाच सामन्यांची मालिका खेळणार आहे. भारताला जुलै,ऑगस्ट २०२३ मध्ये वेस्ट इंडिज दौऱ्यावर दोन टेस्ट, तीन वनडे आणि तीन टी-२० सामने खेळायचे आहेत. तर इंग्लंड विरोधात भारतात होणारी पाच सामन्यांची मालिका जानेवारी पासून मार्च २०२४ च्या दरम्यान होणार आहे.

ऑस्ट्रेलियाचा संघ पुढच्या वर्षी सुरुवातीलाच भारतात चार टेस्ट खेळणार आहे. भारतीय टीम २०२४-२५ मध्ये ऑस्ट्रेलियात पाच टेस्ट खेळणार आहे. विशेष म्हणजे १९९१ नंतर असं पहिल्यांदाच होणार आहे. भारत सप्टेंबर २०२४ मध्ये बांगलादेश विरुद्ध दोन टेस्ट खेळणार आहे. तर २०२३ मध्ये ५० षटकांच्या विश्वकपच्या आधी भारतीय संघ २७ वनडे खेळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: बीड जिल्ह्यात कोण जिंकलं? वाचा एका क्लिकवर

Sambhajinagar News : संभाजीनगरमध्ये राडा, पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज, पाहा Video

Longest River In Maharashtra: महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? पवित्र तीर्थस्थान म्हणून ओळख

Vidhan Sabha Election Result : रायगड जिल्ह्यात महायुतीची सरशी; महाविकास आघाडीच्या हाती भोपळा

Maharashtra Election Result: उल्हासनगरात राष्ट्रवादीला जबर धक्का! भाजपच्या कुमार आयलानींचा मोठा विजय

SCROLL FOR NEXT