IND vs ZIM: केएल राहुल दुखापतीनंतर पुनरागमन करण्यास तयार, स्वतः फिटनेसबद्दल दिली अपडेट

टीम इंडीयाचा तारांकित सलामीवीर केएल राहुल सुरूवातीला दुखापतीमुळे संघाच्या बाहेर होता, यानंतर त्याला कोरोनाची लागण झाली, त्यामुळे तो गेल्या काही दिवसापासून संघाच्या बाहेर आहे.
KL Rahul, IND vs ZIM
KL Rahul, IND vs ZIMSaam Tv
Published On

नवी दिल्ली : टीम इंडीयाचा (Team India) तारांकित सलामीवीर केएल राहुल सुरूवातीला दुखापतीमुळे संघाच्या बाहेर होता, यानंतर त्याला कोरोनाची लागण झाली, त्यामुळे तो गेल्या काही दिवसापासून संघाच्या बाहेर आहे. उद्यापासून भारत विरुद्ध झिम्बाब्वे मालिका सुरू होणार आहे. या मालिकेतून के एल राहुल (K L Rahul) पुनरागमन करणार आहे. के एल राहुलने या संदर्भात माहिती दिली आहे.

भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील ३ सामन्यांच्या वनडे मालिकेला उद्यापासून सुरुवात होत आहे. यापूर्वी राहुलची या दौऱ्यासाठी निवड झाली नव्हती. शिखर धवनकडे संघाची कमान होती. पण तंदुरुस्ती चाचणी उत्तीर्ण झाल्यानंतर राहुलला संघात स्थान देण्यात आले नाही तर त्याला कर्णधारही करण्यात आले. आता धवनकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. राहुल वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-20 मालिकेतून पुनरागमन करण्याच्या तयारीत होता, पण कोरोनामुळे ते होऊ शकला नाही.

KL Rahul, IND vs ZIM
Rohit Sharma: रोहित शर्माची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची झुंबड, व्हिडिओ व्हायरल

केएल राहुलने (K L Rahul) सोशल मीडियावर त्याच्या तब्येती संदर्भात अपडेट दिली आहे. त्याने एक फोटो शेअर केला आहे. यासह त्याने भारताचा ध्वज आणि निळ्या रंगाचे हृदयही बनवले आहे. टीम इंडिया फक्त ब्लू जर्सीमध्ये उतरते. २७ ऑगस्टपासून यूएईमध्ये सुरू होणाऱ्या टी-20 आशिया चषक स्पर्धेसाठी त्याचा संघात समावेश करण्यात आला आहे.

केएल राहुलची (K L Rahul) एकदिवसीय सामन्यांमध्ये सलामीवीर आणि फलंदाज म्हणून चांगली कामगिरी आहे. सलामीवीर म्हणून त्याने २१ डावात ८८४ धावा केल्या आहेत. त्याचा रनरेट सरासरी ४७ आहे. त्याने ३ शतके आणि ६ अर्धशतके केली आहेत. त्याने ४२ एकदिवसीय सामन्यांमध्ये ४७ च्या सरासरीने १६३४ धावा केल्या आहेत. त्याने ५ शतके आणि १० अर्धशतके केली आहेत. त्याने आतपर्यंत ११२ धावांची सर्वोत्तम खेळी केली आहे.

KL Rahul, IND vs ZIM
७ मॅचमध्ये ठोकली ६ शतके, कुटुंब सोडून प्रशिक्षकाच्या घरी राहिला; आता टीम इंडियात संधी

३० वर्षीय केएल राहुलचा (K L Rahul) टी-२० मध्येही रेकॉर्ड आहेत. त्याने आयपीएल २०२२ मध्ये ६१६ धावा केल्या होत्या. त्याने २ शतकेही झळकावली आहेत. त्याला आयपीएलमध्ये (IPL) लखनौ सुपर जायंट्स या नव्या संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये त्याने ५६ सामन्यात १८३१ धावा केल्या आहेत. यात त्याचा रनरेट सरासरी ४१ आहे. तसेच २ शतके आणि १६ अर्धशतकेही झळकवली आहेत. यासह त्याने नाबाद ११० धावांची मोठी खेळी केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com