dutee chand  saam tv
Sports

Dutee Chand: आशियाई क्रीडा स्पर्धा तोंडावर असताना द्युती चंदला मोठा धक्का! ४ वर्ष मैदानापासून राहणार दुर

Dutee Chand Banned: भारताला २ वेळेस रौप्यपदक जिंकून देणारी अॅथलिट द्युती चंद मोठ्या अडचणीत सापडली आहे.

Ankush Dhavre

Dutee Chand Banned For 4 Years:

येत्या काही दिवसात आशियाई क्रीडा स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. या स्पर्धेपूर्वी भारताला मोठा धक्का बसला आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला २ वेळेस रौप्यपदक जिंकून देणारी अॅथलिट द्युती चंद मोठ्या अडचणीत सापडली आहे.

ती डोपिंगच्या जाळ्यात अडकली आहे. याच कारणास्तव तिच्यावर ४ वर्षांची बंदी घातली गेली आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानूसार ही बंदी ३ जानेवारी २०२३ पासून घातली गेली आहे.

द्युती चंदने NADA च्या कलम २.१ आणि २.२ चे उल्लंघन केले आहे. त्यामुळेच NADA ADR २०२१ च्या कलम १०.२.१.१ नुसार तिला ३ जानेवारीपासून पुढील ४ वर्षे कुठल्याही स्पर्धेत सहभाग घेता येणार नाही.

NADA ने ५ आणि २६ डिसेंबर रोजी द्युतीचे सँपल घेतले होते. या दोन्ही सँम्पलमध्ये 'इतर ऍनाबॉलिक एजंट/एसएआरएमएस' असे प्रतिबंधीत पदार्थ सापडले आहेत. त्यामुळे तिच्यावर ४ वर्षांसाठी बंदी घातली गेली होती. या बंदीचा कालावधी ३ जानेवारी २०२३ पासून सुरू झाला आहे. त्यामुळे बंदी लावल्यानंतर तिने जे काही मेडल्स मिळवले आहेत किंवा विक्रम केले आहेत ते परत घेण्यात येतील. (Latest sports updates)

दरम्यान एडीडीपी पॅनलनूसार, तिने या पदार्थांचे सेवन का केले याबाबत ती स्पष्टीकरण देऊ शकली नाही. तिने या पदार्थांचे सेवन चुकून घेतले की निष्काळदजीपणामुळे घेतले गेले, हे सिद्ध करण्यास ती अपयशी ठरली आहे. माध्यमातील वृ्त्तानुसार तिने डॉक्टरांऐवजी फिजिओथेरेपिस्टच्या म्हणण्यावरून औषध घेतले होते. आता तिच्यावर घालण्यात आलेल्या बंदीवर अपील करण्यासाठी तिच्याकडे २१ दिवसांचा अवधी असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fermented Rice Water: शिळे तांदळाचे पाणी प्यायल्यास शरीरावर कसे परिणाम होतात?

Ration Card: घरबसल्या रेशन कार्डमध्ये जोडा कुटुंबातील सदस्याचे नवीन नाव? जाणून घ्या प्रोसेस

Wardha Accident : वर्ध्यात भीषण अपघाताचा थरार; बस आणि ट्रेलरची धडक, वाहनांचा चक्काचूर

Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, बोगद्यामध्ये ७-८ वाहनांची एकमेकांना जोरदार धडक

Saiyaara Vs Ye re ye re paisa 3: 'सैयारा'मुळे मराठी चित्रपटाला शोच मिळेना; मनसे नेत्यानं दिला कडक इशारा

SCROLL FOR NEXT