

शिवाजी पार्कावर ठाकरे बंधूंची जोरदार सभा पार पडली
उद्धव ठाकरेंनी मुंबईची ओळख बदलण्याचा भाजपवर गंभीर आरोप केला
मुंबई महानगरपालिका निवडणुकीत वातावरण तापलं
महानगरपालिका निवडणुकांमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या महापालिकांमध्ये मुंबईची निवडणूक राज्यात चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. त्याच कारण म्हणजे ठाकरे गट प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांची झालेली युती. दोन्ही बंधूंच्या युतीमुळे महायुतीचं धाबे दणाणले आहे. आज राज आणि उद्धव ठाकरेंची संयुक्त सभा झाली. यासभेतून दोन्ही बंधूंनी भाजपचा चांगलाच समचार घेतला. भाजपला मुंबई का हवी? त्यांचा डाव काय आहे याची पोलखोल उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणातून केली.
शिवाजी पार्कमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची संयुक्त सभा झाली. या सभेत उद्धव ठाकरे यांनी जोरदार भाषण केले. भाजपचा मुंबई अदानींना विकण्याचा डाव आहे. तसेच मुंबईचे बॉम्बे करण्याचाही कट आहे, असा हल्लबोल उद्धव ठाकरेंनी केला. त्याचबरोबर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी भाजप नेते अण्णामलाई यांच्या विधानचा चांगलाच समाचार घेतला. सुरुवातीला राज ठाकरेंनी अण्णामलाई यांच्या उल्लेख रसमल्लाई केला. त्यानंतर मुंबई महाराष्ट्राचे शहर नसल्याचं म्हणणाऱ्या अण्णामलाई यांना त्यांनी शिवी दिली. मुंबई आणि महाराष्ट्रचा संबंध म्हणता तर तुमचा येथे काय संबंध असा सवाल राज ठाकरेंनी केला.
त्यानंतर भाषणासाठी आलेल्या उद्धव ठाकरेंनी भाजपच्या मनात काय चालू आहे, जगासमोर आल्याचं म्हटलंय. अण्णामलाई यांच्या विधानामुळे मुंबईचं परत बॉम्बे करायचा डाव त्यांच्या मनात आहे का? असा सवाल उपस्थित होत असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. अण्णामलाई हे भाजपच्या मनातले बोलेत. आम्हाला महापालिका का पाहिजे हे आम्ही स्पष्ट सांगतो. तर भाजपला मुंबई का पाहिजे तर मुंबई अदानीच्या घशात घालायचीय. मुंबईत प्रदूषण बांधकामामुळे झाले आहे. या बांधकामांसाठीचं ७० टक्के सिमेंट अदानीकडून घेतलं जात आहे, असा मोठा दावा उद्धव ठाकरे यांनी केला.
आपल्या भाषणाच्या सुरुवातीला उद्धव ठाकरे यांनी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ आणि त्यासाठी देण्यात आलेला लढ्याची आठवण केली.मुंबई महापालिकेचा महापौर हिंदूच होणार, असे भाजपकडून सांगितले जातंय. यावर बोलताना उद्धव ठाकरेंनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीची आठवण करून दिली. त्या आंदोलनात जनसंघ कुठेही नव्हता. संयुक्त महाराष्ट्र समिती माझे आजोबा आणि इतरांनी स्थापन केली होती. सर्व पक्ष एकत्र होते. मुंबई महाराष्ट्राला मिळालीच पाहिजे, असे धोरण होते. तेव्हाही गुजरातचा मुंबईवर डोळा होता. त्यावेळी मोरारजी देसाई हा नरराक्षक गुजरातमध्ये जन्मला होता. त्याने संयुक्त महाराष्ट्राचा लढा लढणाऱ्या आंदोलकांना गोळ्या घालण्याचा आदेश दिल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.