भारत विरुध्द आयर्लंड यांच्यातील ३ टी -२० सामन्यांच्या मालिकेला आजपासून प्रारंभ होणार आहे. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत हार्दिक पंड्या संघाचे नेतृत्व करताना दिसून येणार आहे.
या सामन्यात काही युवा खेळाडू पदार्पण करताना दिसून येऊ शकतात. ज्यात रिंकू सिंग सारख्या युवा खेळाडूंचा समावेश आहे.
कोलकाता नाईट रायडर्स संघासाठी तोडफोड कामगिरी करणाऱ्या रिंकू सिंगची आयर्लंड दौऱ्यासाठी निवड केली गेली आहे. त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये देखील दमदार कामगिरी केली आहे.
त्याची ही कामगिरी पाहता त्याला आयर्लंडविरुध्दच्या मालिकेसाठी संधी दिली जाऊ शकते. तसेच यष्टिरक्षक फलंदाज म्हणून संजू सॅमसन आणि जितेश शर्मा हे दोन पर्याय उपलब्ध आहेत. या दोघांपैकी एकाला प्लेइंग ११ मध्ये स्थान दिले जाऊ शकते.
वेस्टइंडीज दौऱ्यावर पदार्पण करणारा यशस्वी जयस्वाल या सामन्यात डावाची सुरुवात करताना दिसून येऊ शकतो. तर त्याला साथ देण्यासाठी ऋतुराज गायकवाड मैदानावर येऊ शकतो. तर वेस्टइंडीज विरुध्दची मालिका गाजवणारा तिलक वर्मा या मालिकेत चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी येऊ शकतो.
या फलंदाजाने आयपीएल स्पर्धेत देखील दमदार कामगिरी केली होती. तसेच देशांतर्गत क्रिकेटमध्येही या खेळाडूने धावांचा पाऊस पाडला आहे. (Latest sports updates)
क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे भेदक गोलंदाज जसप्रीत बुमराह या सामन्यातून कमबॅक करताना दिसून येणार आहे. दुखापतीतून परतल्यानंतर तो नुकताच नेट्समध्ये सराव करताना दिसून आला आहे. त्याला साथ देण्यासाठी मुकेश कुमारचा प्लेइंग ११ मध्ये समावेश केला जाऊ शकतो. मुकेशने वेस्टइंडीज विरूध्दच्या वनडे आणि टी -२० मालिकेत अप्रतिम गोलंदाजी केली होती.
आयर्लंडविरूद्धच्या टी-२० मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ:
ऋतुराज गायकवाड़, यशस्वी जयसवाल, संजू सैमसन (विकेटकीपर), तिलक वर्मा, रिंकू सिंह, शिवम दुबे, वाशिंगटन सुंदर, जसप्रीत बुमराह (कप्तान), रवि बिश्नोई, अर्शदीप सिंह, मुकेश कुमार
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.