Ishan Kishan Hairstyle: आशिया चषकापूर्वी ईशानने केला नवा लूक, स्टायलिश हेयरस्टाईल पाहून नेटकऱ्यांना आठवला धोनी

Ishan Kishan New Look: आपल्या आक्रमक फलंदाजीमूळे चर्चेत असणारा ईशान किशन एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे.
ishan kishan
ishan kishan instagram
Published On

Ishan Kishan Hairstyle Photo:

भारतीय संघाचा आक्रमक फलंदाज ईशान किशनने नुकताच संपन्न झालेल्या वेस्टइंडीज दौऱ्यावर दमदार कामगिरी केली होती. या दौऱ्यावर त्याने ४ अर्धशतके झळकावली. रिषभ पंत संघाबाहेर असल्यामुळे आगामी आशिया चषक आणि वनडे वर्ल्डकपसाठी रिषभ पंतऐवजी ईशान किशनला संघात स्थान मिळण्यासाठी प्रबळ दावेदार मानलं जात आहे. दरम्यान मैदानावर असताना आपल्या आक्रमक फलंदाजीमूळे चर्चेत असणारा ईशान किशन एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे.

ishan kishan
IND VS IRE 1st T20I: ईशान अन् संजूचं करियर धोक्यात; टीम इंडियात या दोघांहून खतरनाक खेळाडूची एन्ट्री

ईशान किशनच्या हेयरस्टाईलची चर्चा..

आशिया चषक सुरू होण्यापूर्वी ईशान किशन आपल्या नव्या लुकमूळे चर्चेत आला आहे. त्याच्या या नव्या लुकचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे. नेटकरी या फोटोवर भन्नाट प्रतिक्रीया देताना दिसून येत आहे. नेटकऱ्यांनी ईशान किशनची तुलना एमएस धोनीसोबत केली आहे. तर अनेकांनी त्याला ट्रोल केलं आहे. ईशान किशनने आपल्या इंस्टाग्रामवर त्याचा फोटो शेअर केला आहे. त्याच्या या पोस्टवर भारतीय कर्णधार हार्दिक पंड्याने फायर ईमोजी शेअर केला आहे. (Latest sports updates)

आशिया चषक स्पर्धेत घालणार घुमाकूळ..

यावर्षी भारतात वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेचा थरार रंगणार आहे. या स्पर्धेपूर्वी आशिया चषक स्पर्धा खेळवली जाणार आहे. या दोन्ही स्पर्धा भारतीय संघाच्या दृष्टीने अतिशय महत्वाच्या असणार आहे.

या स्पर्धेत रिषभ पंत खेळताना दिसून येणार नाही. तर दुखापतीतून सावरलेल्या केएल राहुलच्या खेळण्यावरही प्रश्नचिन्ह आहे. त्यामुळे ईशान किशनला भारतीय संघात यष्टीरक्षक फलंदाज म्हणून स्थान मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. येत्या २० ऑगस्ट रोजी भारतीय संघाची घोषणा केली जाऊ शकते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com