IND vs IRE 1st T20I: स्टार, सोनी नव्हे तर इथे पाहता येणार भारत- आयर्लंड टी-२० सामना; Subscription ची गरज नाही

When And Where To Watch India vs Ireland 1st T20I: जाणून घ्या या सामन्याबद्दल सर्व काही.
team india
team indiasaam tv
Published On

India vs Ireland Match Streaming News:

भारताचा वेस्टइंडीज दौरा नुकताच संपन्न झाला. या दौऱ्यावर झालेल्या टी -२० मालिकेत भारतीय संघाला २-३ ने पराभव पत्करावा लागला आहे. आता भारतीय संघ आयर्लंडविरुध्द २ हात करण्यासाठी सज्ज झाला आहे.

हे दोन्ही संघ ३ टी -२० सामन्यांची मालिका रंगणार आहे. या मालिकेतील पहिला सामना आजपासून रंगणार आहे. दरम्यान जाणून घ्या या सामन्याबद्दल सर्व काही.

team india
IND vs IRE: ओपनिंग बॅट्समन अन् बॉलिंग अटॅकमध्ये हाेणार बदल! आयर्लंडविरूद्ध या नव्या प्लेइंग ११ सह टीम इंडिया उतरणार मैदानात

भारत विरुध्द आयर्लंड या दोन्ही संघांमध्ये ३ सामन्यांची मालिका रंगणार आहे. या मालिकेतील सामने १८,२० आणि २३ ऑगस्ट रोजी खेळवले जाणार आहेत. या मालिकेत जसप्रीत बुमराह भारतीय संघाचे नेतृत्व करताना दिसून येणार आहे. मालिकेतील पहिला सामना डब्लिनमध्ये रंगणार आहे.

कुठे पाहता येईल सामना?

भारत विरुध्द आयर्लंड या सामन्याच्या लाईव्ह प्रक्षेपणाचे हक्क Viacom 18 कडे आहेत. त्यामुळे हे सामने Sports 18 वर लाईव्ह पाहायला मिळू शकतात. या मालिकेतील तिन्ही सामने भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७:३० वाजता सुरू होतील.

इथे पाहा लाईव्ह..

भारत विरुध्द आयर्लंड यांच्यातील टी -२० मालिका Jio cinema वर लाईव्ह पाहता येणार आहे. तुम्ही हा app डाऊनलोड करून किंवा www.jiocinema.com वर जाऊन देखील हा सामना पाहू शकता. यासह या सामन्याचे लाईव्ह अपडेट्स तुम्ही www.saamtv.com वर मिळवू शकता. (Latest sports updates)

team india
IND VS IRE 1st T20I: ईशान अन् संजूचं करियर धोक्यात; टीम इंडियात या दोघांहून खतरनाक खेळाडूची एन्ट्री

या मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ:

ऋतुराज गायकवाड़, यशस्वी जयसवाल, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), तिलक वर्मा, रिंकू सिंग, शिवम दुबे, वॉशिंगटन सुंदर, जसप्रीत बुमराह (कर्णधार), रवि बिश्नोई, अर्शदीप सिंह, मुकेश कुमार.

असा आहे आयर्लंडचा संघ:

अँड्रयू बालबर्नी, पॉल स्टर्लिंग (कर्णधार), लोर्कन टकर, हॅरी टेक्टर, जॉर्ज डॉकरेल, गॅरेथ डेलानी, कर्टिस कँपर, मार्क अडायर, जोशुआ लिटिल, बॅरी मैक्कार्थी, बेंजामिन व्हाइट

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com