team india x
Sports

भारताला वर्ल्डकप जिंकवून देणारा क्रिकेटर बॅन; तिकडे राजस्थानच्या राजकुमारीला संताप, काय आहे कनेक्शन? वाचा

S sreesanth : केरळ क्रिकेट असोसिएशनने भारताचा माजी क्रिकेटपटू एस. श्रीशांतवर ३ वर्षांची बंदी घातली आहे. संजू सॅमसनला वगळल्यावरुन केरळ क्रिकेट असोसिएशनवर श्रीशांतने जहरी टीका केली होती.

Yash Shirke

S Sreesanth Ban : भारताचा माजी क्रिकेटपटू एस श्रीशांत पुन्हा एकदा वादात अडकला आहे. केरळ क्रिकेट असोसिएशनने श्रीशांतवर ३ वर्षांची बंदी घातली आहे. यामुळे तो क्रिकेटशी संबंधित कोणतेही काम करु शकणार नाही. केरळ क्रिकेट असोसिएशनवर टीका केल्याबद्दल आणि त्यांच्यावर आरोप केल्याबद्दल श्रीशांतवर कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणावर श्रीशांतची पत्नी भुवनेश्वरी कुमारी यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

श्रीशांतने चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या आधी भारतीय क्रिकेटपटू संजू सॅमसनचे समर्थन करत वादग्रस्त वक्तव्य करत केरळ क्रिकेट असोसिएशनवर टीका केली होती. सॅमसनने केरळने विजय हजारे ट्रॉफीच्या संघातून वगळले होते. यानंतर चॅम्पियन्स ट्रॉफीसाठीच्या भारतीय संघात संजूला स्थान मिळाले नव्हते. तेव्हा संजू सॅमसनला पाठिंबा देताना श्रीशांतने केरळ क्रिकेट असोसिएशनवर निशाणा साधला होता. यामुळे असोसिएशनने श्रीशांतवर कारवाई केली.

श्रीशांत केरळ प्रीमियर लीगच्या कोल्लम एरीज या फँचायझीचा सहमालक आहे. श्रीशांतवर अॅक्शन घेताना असोसिएशनने कोल्लम एरीजचे मालक श्रीशांत, इतर संघ, अ‍ॅलेप्पी टीमचे मुख्य कंटेंट क्रिएटर साई कृष्णन आणि अ‍ॅलेप्पी रिपल्स यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. यावर श्रीशांतने प्रतिक्रिया दिली नाही. श्रीशांतनेने फ्रँचायझीचा मालक म्हणून कराराच्या अटींचेही उल्लंघन केले, त्यानंतर त्याच्यावर बंदी घालण्यात आली.

एस. श्रीशांतची पत्नी जयपुरच्या राजघराण्याची राजकुमारी आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत राग व्यक्त केला. त्या म्हणाल्या, 'काही क्रिकेट संघटना क्रिकेटसाठी नाही; तर नाटक, अहंकार, व्यवस्थापन आणि ऐतिहासिक शोध यात प्रभुत्त्व मिळवण्यासाठी खरोखरच कौतुकास पात्र आहेत. त्यांना न आवडणारं असं काही बोललं, तर लगेच बूम! बॅन, बदनामी आणि ट्रॉफीच्या यादीपेक्षाही मोठी असणार प्रेस रिलीज समोर येते. क्रिकेट राजनीतीचा डेली सोप बनत चालला आहे.'

bhuvneshwari sreesanth insta story

एस. श्रीशांतवर याआधीही बॅन टाकण्यात आला होता. २०१३ च्या आयपीएल स्पॉट फिक्सिंगमध्ये श्रीशांतचे नाव समोर आले होते. या प्रकरणी त्याला श्रीशांतला अटक झाली होती आणि त्यानंतर त्याच्यावर आजीवन बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर बंदीची मर्यादा ७ वर्षांपर्यत ठेवण्यात आली. क्रिकेटच्या मैदानावर नियम पाळण्याचा कडक इशारा त्याला देण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: फडणवीस करणार मंत्रिमंडळाची साफसफाई, मंत्रिमंडळात फेरबदल, 8 विकेट पडणार?

Maharashtra Politics: यापुढे माझ्या अध्यक्षतेखाली बैठका घ्या! राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्यावर शिरसाट संतापले

पालकांनो मुलांना सांभाळा,12 व्या मजल्यावरून पडून चिमुकलीचा मृत्यू

Fatty Liver In Women's: फॅटी लिव्हर असल्यास महिलांमध्ये दिसतात 'अशी' लक्षणे

मुळशीत घरात शिरला भला मोठा साप, आजीनं दाखवला धमाका

SCROLL FOR NEXT