India Women vs South Africa Women, 3rd T20I  
Sports

IND W vs SA: स्मृतीचा विजयी षटकार; १० विकेट राखत टीम इंडियाचा विजय

India Women vs South Africa Women, 3rd T20I : भारतीय महिला क्रिकेट संघ आणि दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघ यांच्यातील ३ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना भारताने जिंकलाय.

Bharat Jadhav

चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर झालेल्या ३ टी२० सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना भारताने जिंकलाय. भारतीय गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेच्या संघाला अवघ्या ८४ धावांवर बाद केलं होतं. त्यानंतर भारतीय संघाने आफ्रिकेचं माफक आव्हान १० विकेट राखत पार केलं. आव्हान पूर्ण करताना धमाकेदार फलंदाजी करत स्मृती मंधनाने अर्धशतक केलं.

भारतीय संघाची कर्णधार हरप्रीत कौरने नाणेफेक जिंकत आफ्रिकेला फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं. भारताच्या स्टार गोलंदाज पूजा वस्त्राकार आणि राधा यादवने भेदक गोलंदाजी करत दक्षिण आफ्रिकेच्या संघाचं कंबरडं मोडलं. दक्षिण आफ्रिकेच्या संपूर्ण संघाला १७.१ षटकांत ८४ धावांत बाद केलं. तर पूजाने ३.१ षटकात केवळ १३ धावा देत ४ बळी घेतले. राधाने ३ षटकांच्या गोलंदाजीत केवळ ६ धावा दिल्या आणि ३ बळी घेतले.

दक्षिण आफ्रिकेला मालिकेच्या अखेरच्या सामन्यात चांगली कामगिरी करता आली नाही. आफ्रिकेने दिलेलं माफक आव्हान पार करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाने अवघ्या १० षटकात विजय मिळवला. विशेष म्हणजे भारताच्य सलामी जोडीनेच हा सामना जिंकवून दिला. सलामीसाठी शेफाली वर्मा आणि स्मृती मंधना मैदानात उतरले होते. यावेळी स्मृतीने आपलं अर्धशतक केलं. विजयी षटकार मारत स्मृतीने भारताच्या खिश्यात मालिका घातली.

भारताचा संघ

स्मृती मानधना, शेफाली वर्मा, डी हेमलथा/एस सजना, हरमनप्रीत कौर (कर्णधार), जेमिमाह रॉड्रिग्स, उमा छेत्री (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर, राधा यादव, श्रेयंका पाटील, अरुंधती रेड्डी.

दक्षिण आफ्रिकेचा संघ

लॉरा वोल्वार्ड (कर्णधार), ताजमिन ब्रिट्स, मारिजाने कॅप, ॲनेके बॉश, क्लो ट्रायॉन, नादिन डी क्लर्क, ॲनेरी डेर्कसेन, एलिस-मेरी मार्क्स, सिनालो जाफ्ता (विकेटकीपर), अयाबोंगा खाका, नॉनकुलुलेको म्लाबा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Police Income Tax Investigation: इन्कम टॅक्स विभागानं वाढवलं टेन्शन, थेट 1050 पोलिसांना नोटीस, पोलिस दलात मोठी खळबळ

Maharashtra Live News Update : मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या सुरक्षेत वाढ

Marwadi Garlic Chutney: वरण भातासोबत काहीतरी झणझणीत खावसं वाटतयं? मग मारवाड स्टाईल लसूण चटणी ठरेल बेस्ट

धक्का लागल्याने सटकली; रागाच्या भरात हॉटेलबाहेर धारदार शस्त्राने तरुणाची हत्या, डोंबिवलीत खळबळ

फलटण डॉक्टर मृत्यू प्रकरणी काँग्रेस आक्रमक; उद्या वर्षा बंगल्याला घेरावाचा इशारा|VIDEO

SCROLL FOR NEXT