Team India Womens cricket saam tv
Sports

India Women Team: इग्लंडविरुद्ध वनडे, टी २० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा, कुणाला संधी, कुणाला डच्चू?

India-England Series : इंग्लंडविरुद्धच्या वनडे आणि टी २० मालिकेसाठी भारतीय महिला संघाची घोषणा करण्यात आली आहे. टी २० संघात स्फोटक फलंदाज शेफाली वर्माचं पुनरागमन झालं आहे.

Nandkumar Joshi

भारतीय महिला क्रिकेट संघ याच महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात पाच टी २० आणि तीन वनडे सामने खेळणार आहे. या दोन्ही मालिकांसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. हरमनप्रीत कौर भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे. स्मृती मंधानाकडे उपकर्णधार म्हणून जबाबदारी दिली आहे.

शेफालीचं पुनरागमन, सायलीचाही समावेश

भारतीय महिला टी २० संघात सलामीवीर शेफाली वर्मा हिचं पुनरागमन झालं आहे. शेफालीने महिला प्रीमिअर लीग २०२५ मध्ये दमदार कामगिरी केली आहे. १५२.७६ च्या स्ट्राइक रेटने ३०४ धावा केल्या होत्या. अष्टपैलू स्नेह राणा हिची देखील वापसी झाली आहे. ती अनुभवी फिरकीपटू असून, जुलै २०२३ नंतर ती टी २० संघात नव्हती. तर मुंबईची वेगवान गोलंदाज सायली सतघरे हिलाही संधी मिळाली आहे. तिने देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी केली होती. सायलीला वनडे आणि टी २० संघातही स्थान देण्यात आलं आहे.

वेगवान गोलंदाज रेणुका सिंह आणि फिरकीपटू श्रेयंका पाटील यांना वगळण्यात आलं आहे. पण त्याबाबत आतापर्यंत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. रेणुका सिंहच्या खांद्यावर शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतर ती बऱ्याचदा दुखापतीमुळं संघाबाहेर राहिली आहे. तर श्रेयंका पाटीलनं देशांतर्गत क्रिकेट आणि महिला प्रीमिअर लीगमध्ये चांगली कामगिरी केली होती. तरीही तिला संघात स्थान देण्यात आलेलं नाही.

भारतीय महिला टी २० संघ -

हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, ऋचा घोष, यास्तिका भाटिया, हरलीन देओल, दिप्ती शर्मा, स्नेह राणा, नल्लापुरेड्डी चरणी, शुचि उपाध्याय, अमनजोत कौर, अरुंधती रेड्डी, क्रांती गौड, सायली सतघरे.

भारतीय महिला वनडे संघ -

हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना (उपकर्णधार), हरलीन देओल, जेमिमा, प्रतिका रावल, ऋचा घोष, यास्तिका, तेजल हसबनीस, दिप्ती शर्मा, स्नेह राणा, नल्लापुरेड्डी चरणी, शुचि उपाध्याय, अमनजोत कौर, अरुंधती रेड्डी, क्रांती गौड, सायली सतघरे

भारत - इंग्लंड (महिला संघ) वेळापत्रक

पहिला टी २० सामना - २८ जून, नॉटिंघम

दुसरा टी २० - १ जुलै - ब्रिस्टल

तिसरा टी २० - ४ जुलै - द ओव्हल

चौथा टी २० - ९ जुलै - मँचेस्टर

पाचवा टी २० - १२ जुलै - बर्मिंघम

पहिली वनडे मॅच - १६ जुलै - साउथम्प्टन

दुसरी वनडे मॅच - १९ जुलै - लॉर्ड्स

तिसरी वनडे मॅच - २२ जुलै - चेस्टर ली स्ट्रीट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबई पोलिसांकडून गुंडागिरी, साम टिव्हीच्या पत्रकारावर हल्ला, कानशिलात लगावली अन्.. VIDEO समोर

Blood Moon 2025 : चंद्रग्रहणाच्या वेळी चंद्र लाल का दिसतो? खगोलशास्त्रीय कारण

Hair Care Tips : मऊ अन् चमकदार केस पाहिजेत? फेकण्याऐवजी वापरलेल्या चहा पावडरचा 'असा' करा वापर

Sajjangad Fort: मन शांत-प्रसन्न करायचंय? साताऱ्याजवळ असलेल्या सज्जनगडाला नक्की भेट द्या

Prime Minister Resign : पंतप्रधानांचा राजीनामा, सत्ताधारी पक्षात फूट पडू नये म्हणून घेतला मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT