2026 एशियन गेम्समध्ये भारताने आणखी एक गोल्ड मेडल पटकावलंय. 10 मीटर एअर पिस्तूल मिक्स इव्हेंटमध्ये भारताच्या कमलजीत सिंह आणि सुरुची सिंह या जोडीने जबरदस्त कामगिरी करत गोल्ड मेडलवर निशाणा साधला. हे या स्पर्धेतील भारताचं दुसरं गोल्ड मेडल ठरलंय. यापूर्वी भारतीय महिला क्रिकेट टीमने भारताला पहिलं गोल्ड मिळवून दिलं होतं.
या विजयामुळे भारताच्या एकूण मेडल्सची संख्या आता 19 वर पोहोचली आहे. कमलजीत आणि सुरुची यांनी अंतिम फेरीत एकूण 484.6 पॉईंट्स मिळवले. त्यांनी दक्षिण कोरियाच्या जोडीला 6.6 पॉईंट्सने मागे टाकत गोल्ड मेडल जिंकलं. दक्षिण कोरियाला 478 पॉईंट्स मिळाले तर इराणने 415.8 गुणांसह तिसरं स्थान मिळवलंय.
कमलजीत आणि सुरुची यांनी अंतिम फेरीच्या सुरुवातीपासूनच चांगली आघाडी घेतली होती. मात्र, दक्षिण कोरियाचे खेळाडू भारतीय नेमबाजांवर सतत दबाव टाकत होते. अशा परिस्थितीतही भारतीय जोडीने संयम सोडला नाही. अगदी चोख कामगिरी करत त्यांनी सुवर्णपदकाला गवसणी घातलीये.
पहिल्याच सीरिजमध्ये भारताने दक्षिण कोरियावर 4.9 पॉईंट्सची आघाडी घेतली. शूटिंगमध्ये ही आघाडी महत्त्वाची मानली जाते. मात्र दुसऱ्या सीरिजमध्ये दक्षिण कोरियाने जोरदार कमबॅक केलं. त्यामुळे भारताची आघाडी कमी होऊन फक्त 1.2 पॉईंट्स आली. त्या वेळी कमलजीत आणि सुरुची यांच्यावर दबाव होता. मात्र दोघांनीही शांतपणे आपला खेळ सुरू ठेवला. त्यानंतर भारताची आघाडी पुन्हा वाढत गेली.
सामन्यादरम्यान एका टप्प्यावर भारताने दक्षिण कोरियावर तब्बल 7.2 गुणांची आघाडी मिळवली होती. त्यामुळे भारताचं गोल्ड मेडल जवळपास निश्चित वाटत होते. मात्र शेवटच्या क्षणी कोरियन खेळाडूंनी पुन्हा दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
अंतिम क्षणी सुरुचीने 10.5 पॉईंट्सचा स्कोअर केला. त्याच वेळी कमलजीतला 9.5 पॉईंट्स मिळाले. मात्र आधी मिळवलेल्या आघाडीच्या जोरावर भारताने अखेर 6.6 गुणांची आघाडी कायम ठेवली आणि सुवर्णपदकावर नाव कोरलं.
कमलजीत सिंह आणि सुरुची सिंह या जोडीने अंतिम फेरीपूर्वीच्या क्वालिफिकेशन राउंडमध्येही दमदार कामगिरी केली होती. त्यांनी या फेरीत पहिलं स्थान मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला होता. फायनलमध्येही पहिल्या सीरिजपासूनच भारतीय जोडीने दक्षिण कोरियावर दबाव कायम ठेवला.
या गोल्ड मेडलसह 2026 एशियन गेम्समध्ये भारताच्या खात्यात आता एकूण 19 पदकं झालीयेत. त्यामध्ये 2 गोल्ड, 8 सिल्व्हर आणि 8 ब्रॉन्झ पदकांचा समावेश आहे. 10 मीटर एअर पिस्तूल मिक्स इव्हेंटमध्ये कमलजीत सिंह आणि सुरुची सिंह यांनी गोल्ड जिंकलंय. याशिवाय पुरुषांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशन्स प्रकारात भारताने सिल्व्हर मेडलही मिळवलंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.