Samosa calories: 1 समोसा आणि 2 जिलेबी खाल्ल्यानंतर किती वेळ वर्कआऊट केलं पाहिजे?

Surabhi Jayashree Jagdish

समोसा-जिलेबीमध्ये किती कॅलरी असतात?

एका 100 ग्रॅम समोशामध्ये सुमारे 261 कॅलरी असतात, तर 100 ग्रॅम जिलेबीमध्ये सुमारे 300 कॅलरी असतात. समोशामध्ये कार्बोहायड्रेट आणि फॅटचे प्रमाणही असते, तर जिलेबीमध्ये कार्बोहायड्रेटचे प्रमाण जास्त असते.

jalebi calories | SAAM TV

अतिप्रमाण टाळा

समोसा आणि जिलेबीमध्ये तेल, साखर आणि फॅटचं प्रमाण असल्यामुळे त्यांच्या वारंवार सेवनाकडे लक्ष देणं गरजेचं ठरतं. FSSAIनेही समोसा, जिलेबी आणि इतर तळलेल्या किंवा गोड पदार्थांचे अतिसेवन टाळण्याचा सल्ला दिला आहे. अशा पदार्थांचं नियमित आणि जास्त प्रमाणात सेवन केल्यास आहारातील फॅट, साखर आणि मीठाचं प्रमाण वाढू शकते.

samosa and jalebi calories | SAAM TV

किती वर्कआउट केला पाहिजे?

तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, १ समोसा आणि २ जिलेबीच्या कॅलरीच्या आसपासचा खर्च करण्यासाठी साधारण १ ते १ तास १५ मिनिटे वर्कआउट केला पाहिजे. त्यांच्या मते व्यायामाचा कालावधी प्रत्येक व्यक्तीनुसार बदलू शकतो. वय, लिंग आणि BMR म्हणजेच शरीराचा बेसल मेटाबॉलिक रेट यानुसार कॅलरी खर्च होण्याचा वेग वेगळा असतो.

1 samosa 2 jalebi calories | SAAM TV

BMR जास्त किंवा कमी असल्यास काय फरक पडतो?

ज्यांचा BMR तुलनेने जास्त असतो त्यांच्या शरीरातून विश्रांतीच्या अवस्थेतही ऊर्जा खर्च होण्याचं प्रमाण अधिक असतं. जास्त BMR असलेल्या व्यक्तीला समान कॅलरी खर्च करण्यासाठी तुलनेने कमी वेळ लागू शकतो.

samosa jalebi calorie count | SAAM TV

३० मिनिटांतही कॅलरी बर्न करू शकतात?

जास्त BMR असलेल्या व्यक्तीला १ समोसा आणि २ जिलेबीच्या कॅलरीच्या आसपासचा ऊर्जा खर्च करण्यासाठी सुमारे ३० मिनिटे लागू शकतात. कमी BMR असलेल्या व्यक्तीला यासाठी १ ते दीड तासापर्यंत वेळ लागू शकतो, असं त्यांनी सांगितलंय. म्हणून प्रत्येक व्यक्तीसाठी एकच ठराविक वर्कआउट वेळ लागू होत नाही.

exercise to burn jalebi calories | SAAM TV

कोणते व्यायाम करता येतील?

समोसा-जिलेबी खाल्ल्यानंतर कॅलरी खर्च करण्यासाठी हाय-इंटेन्सिटी ट्रेनिंग, पोहणे, चालणे आणि स्प्रिंट्स यांसारखे व्यायाम करता येतात. या व्यतिरिक्त स्क्वॅट्स, डेडलिफ्ट आणि बेंच प्रेस यांसारख्या स्ट्रेंथ ट्रेनिंगच्या व्यायामांचाही वापर केला जाऊ शकतो.

calories burned by running | SAAM TV

काय लक्षात ठेवावं?

समोसा आणि जिलेबीसारखे पदार्थ अधूनमधून खाल्लं तर त्यांचे प्रमाण आणि एकूण आहारातील संतुलन लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. FSSAIच्या मार्गदर्शक माहितीनुसार फॅट, साखर आणि मीठाचं प्रमाण जास्त असलेल्या पदार्थांचे सेवन मर्यादित ठेवण्यावर भर दिला जातो.

high calorie Indian snacks | SAAM TV

टीप

ही माहिती विविध सार्वजनिक स्रोतांवर आधारित असून केवळ सामान्य माहितीसाठी देण्यात आली आहे. या माहितीची स्वतंत्र वैद्यकीय पडताळणी आम्ही केलेली नाही. कोणतीही लक्षणे आढळल्यास स्वतः निष्कर्ष काढण्याऐवजी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.

calorie balance | SAAM TV

Cinnamon water: सकाळी सकाळी एक ग्लास प्या दालचिनीचं पाणी, मिळतील जबरदस्त फायदे

येथे क्लिक करा