renuka singh twitter
क्रीडा

IND-W vs PAK-W: You Miss I Hit..! पहिलीच ओव्हर अन् रेणुकाच्या In Swinger वर फेरोजाची दांडी गुल

Ankush Dhavre

India-W vs Pakistan-W: आयसीसी महिला टी -२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेला सुरुवात झाली आहे. या स्पर्धेतील सातव्या सामन्यात भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ आमनेसामने आले आहेत. या स्पर्धेतील पहिला सामना गमावलेल्या पाकिस्तान संघाने या सामन्यात नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाकडून गुल रेणुका सिंगने गुल फेरोजाला बाद करत माघारी धाडलं आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

तर झाले असे की, भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानकडून मुनीबा अली आणि गुल फेरोजा ही जोडी डावाची सुरुवात करण्यासाठी मैदानात आली. तर भारतीय संघाकडून रेणुका सिंग पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाजीला आली. या षटकातील पहिल्याच षटकातील शेवटच्या चेंडूवर तिने गुल फेरोजाला क्लिन बोल्ड केलंय.

मध्यमगती गोलंदाज रेणुका सिंगने टाकलेला शेवटचा चेंडू टप्पा पडताच आत आला, हा चेंडू फेरोजाला कळालाच नाही. ती हालचाल करणार, इतक्यात चेंडू, ऑफ स्पम्पला जाऊन धडकला. हा चेंडू पाहून फेरोजाही शॉक झाली. यासह पाकिस्तानला पहिल्याच षटकात पहिला धक्का बसला. फेरोजा ४ चेंडू खेळून शून्यावर माघारी परतली.

या सामन्यासाठी अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११:

भारतीय संघाची प्लेइंग ११: स्मृति मंधाना, शेफाली वर्मा, हरमनप्रीत कौर (कर्णधार), जेमिमा रॉड्रिग्स, ऋचा घोष (यष्टीरक्षक), दिप्ती शर्मा, अरुंधती रेड्डी, एस सजना, श्रेयंका पाटील, आशा शोभना, रेणुका ठाकुर सिंग

पाकिस्तान महिला संघाची प्लेइंग ११: मुनीबा अली (यष्टीरक्षक), गुल फिरोज़ा, सिदरा अमीन, निदा डार, आलिया रियाज, ओमेमा सोहेल, फातिमा सना (कर्णधार), तुबा हसन, नशरा संधू, सैयदा अरूब शाह, सादीया इकबाल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashok Saraf: महाराष्ट्राच्या महानायकाची पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर धमाकेदार एन्ट्री

Marathi News Live Updates : सायबर हेल्पलाईनच्या माध्यमातून मुंबई पोलिसांनी वाचवले १ कोटी रुपये

Arabian Sea Shiv Smarak : अरबी समुद्रात शिवस्मारकाचा संभाजीराजेंकडून शोध, जलपूजन झालेलं शिवस्मारक गेलं कुठं?

Bigg Boss Marathi Grand Finale: कोकण हार्टेड गर्ल बिग बॉसच्या घरातून बाहेर, प्रेक्षकांचे मानले आभार..

Chhagan Bhujbal : अजित पवार गटाचे बडे नेते पवार गटात जाणार; छगन भुजबळ यांनी सांगितलं विधानसभेचं नेमकं गणित

SCROLL FOR NEXT