shubman gill twitter
क्रीडा

IND vs ZIM: दुसरा सामना जिंकूनही शुभमन गिलची डोकेदुखी वाढली! समोर आलं मोठं कारण

Ankush Dhavre

टी -२०वर्ल्ड कप जिंकल्यानंतर भारतीय संघ झिम्बाब्वे दौऱ्यावर रवाना झाला आहे. या दौऱ्यावर दोन्ही संघांमध्ये पाच टी -२० सामन्यांची मालिका खेळली जात आहे. या मालिकेसाठी शुभमन गिलची कर्णधार म्हणून निवड केली गेली आहे. तर वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देऊन युवा खेळाडूंना संघात स्थान दिले गेले आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाला दारुण पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र दुसऱ्या सामन्यात भारतीय खेळाडूंनी दमदार कमबॅक करत शानदार विजय मिळवला आहे. दरम्यान तिसरा सामना १० जुलै रोजी होणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघाच्या प्लेइंग ११ मध्ये बदल पाहायला मिळू शकतात.

या मालिकेसाठी ज्यावेळी भारतीय संघाची घोषणा केली गेली. त्यावेळी शिवम दुबे, यशस्वी जयस्वाल आणि संजू सॅमसन यांना देखील संघात स्थान दिलं गेलं होतं. मात्र टी २० वर्ल्डकप जिंकून परतल्यानंतर वर्कलोड मॅनेज करण्यासाठी या खेळाडूंना विश्रांती दिली गेली होती. त्यामुळे तिघे खेळाडू सुरुवातीच्या दोन सामन्यांसाठी उपलब्ध नव्हते. मात्र तिसऱ्या सामन्यात हे तिघे खेळाडू संघासोबत जोडले जाणार आहेत. त्यामुळे प्लेइंग ११ कोणाचा पत्ता कट होणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील टी -२० मालिकेतील सामने हरारेमध्ये सुरू आहेत. मालिकेतील पहिला सामना ६ जुलै रोजी खेळला गेला होता. या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर ७ जुलै रोजी झालेल्या सामनात भारतीय संघाने दमदार कामगिरी केली आणि झिम्बाब्वेचा १०० धावांनी धुव्वा उडवला. भारतीय संघाकडून अभिषेक शर्माने शतकी खेळी केली. तर ऋतुराज गायकवाडने अर्धशतक झळकावलं. या दमदार खेळीच्या बळावर भारतीय संघाने २० षटकअखेर २३४ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना झिंबाब्वे संघाचा डाव अवघ्या १३४ धावांवर आटोपला. यासह भारतीय संघाने हा सामना १०० धावांनी आपल्या नावावर केला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दिल्लीत होणाऱ्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका तारा भवाळकर, एकमताने पुण्यात निवड

VIDEO : तिरूपती बालाजीच्या प्रसादात किडे? धक्कादायक माहिती आली समोर

Marathi News Live Updates : नांदेडच्या सिडको भागात राहणाऱ्या 10 जणांना विषबाधा

IND vs PAK: भारत- पाकिस्तान सामन्यात इतिहास घडणार! दुबईत पहिल्यांदाच असं घडणार

Nanded News : सोयाबीनच्या शेंगा उकडून खाल्ल्याने १० जणांना विषबाधा, १४ वर्षीय मुलीचा मृत्यू

SCROLL FOR NEXT