ind vs zim twitter
Sports

IND vs ZIM 4th T20I: भारत- झिम्बाब्वे चौथा सामना रद्द होणार? समोर आली मोठी अपडेट

India vs Zimbabwe Weather Report: भारत आणि झिम्बाब्वे या दोन्ही संघांमध्ये ५ टी-२० सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेत भारतीय संघाने २-१ने आघाडी घेतली आहे.

Ankush Dhavre

भारत आणि झिम्बाब्वे या दोन्ही संघांमध्ये ५ टी-२० सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील चौथा सामना आज हरारेच्या मैदानावर रंगणार आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. तर मालिकेतील पुढील दोन्ही सामने जिंकून भारतीय संघाने मालिकेत २-१ ने आघाडी घेतली आहे. दरम्यान मालिकेतील चौथा सामना जिंकून भारतीय संघ मालिकेत आघाडी घेण्याच्या प्रयत्नात असणार आहे.

कसं असेल हवामान?

हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ४:३० वाजता सुरु होणार आहे. या सामन्यावेळी पाऊस पडण्याची शक्यता ही १५ टक्के इतकी असणार आहे. गेल्या काही सामन्यांमध्येही पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र पावसाचं आगमन झालं नव्हतं. या सामन्यावेळी तापमान ३१ डिग्री सेल्सिअसच्या आसपास असेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

कशी असेल खेळपट्टी?

गेल्या काही सामन्यांमधील निकाल पाहिला, तर खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल असल्याचे पाहायला मिळाले आहे. वेगवान गोलंदाजांना या खेळपट्टीतून मदत मिळत असल्याचे पाहायला मिळाले आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाचा डाव लवकर आटोपला होता. मात्र त्यानंतर दुसऱ्या सामन्यात भारतीय फलंदाजांनी दमदार कमबॅक केल्याचे पाहायला मिळाले होते. या सामन्यातही फलंदाजांचा बोलबाला पाहायला मिळू शकतो.

या मालिकेबद्दल बोलायचं झालं, तर भारतीय संघाने मालिकेत २-१ ने आघाडी घेतली आहे. मालिकेतील पहिल्याच सामन्यात भारतीय संघाला दारुण पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर पुढील दोन्ही सामन्यांमध्ये भारतीय संघाने दमदार कमबॅक केलं. पुढील दोन्ही सामने जिंकून भारतीय संघाने या मालिकेत २-१ ने आघाडी घेतली आहे.

या सामन्यासाठी अशी असू शकते भारतीय संघाची प्लेइंग ११:

शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जायस्वाल, अभिषेक शर्मा, ऋतुराज गायकवाड़, संजू सॅमसन, शिवम दुबे, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, रवि बिश्नोई, तुषार देशपांडे, खलील अहमद

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nagpur : पिकांच्या संरक्षणासाठी तारेत सोडला विद्युत प्रवाह; चारा कापताना झाला घात, विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू

Aamhi Saare Khavayye : खुशखबर! मराठी कुकिंग शो 'आम्ही सारे खवय्ये' येतोय? पाहा VIDEO

Rave Party: रेव्ह पार्टी म्हणजे नेमकं काय?

Maharashtra Live News Update: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांची इच्छा - नितेश राणे

Masala Gobi Recipe : कोबीच्या भाजीला द्या खास ट्विस्ट, मुलं ५ मिनिटांत फस्त करतील टिफिन

SCROLL FOR NEXT