indian cricket team  saam tv
क्रीडा

IND vs WI 2nd ODI Playing 11: दुसऱ्या वनडेत टीम इंडियाची ओपनिंग जोडी बदलणार? रोहितसोबत हा खेळाडू उतरणार मैदानात; पाहा प्लेइंग ११

Ankush Dhavre

Team India Playing 11 IND vs WI 2nd ODI: भारत विरुद्ध वेस्टइंडीज या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना बार्बाडोसच्या मैदानावर रंगणार आहे. पहिला वनडे सामना जिंकून भारतीय संघाने वनडे मालिकेत १-० ची आघाडी घेतली आहे.

यावर्षी भारतीय संघाला वर्ल्डकप खेळायचा आहे. त्यामुळे भारतीय संघात युवा खेळाडूंना संधी देण्याचं सत्र सुरू आहे. हे पाहता भारतीय संघाच्या प्लेइंग ११ मध्ये बदल पाहायला मिळणं कठीण आहे. मात्र बॅटिंग ऑर्डरमध्ये बदल पाहायला मिळू शकतो.

वेस्टइंडीजविरुद्ध झालेल्या पहिल्या वनडे सामन्यात भारतीय संघाच्या फलंदाजी क्रमात बदल पाहायला मिळाले होते. शुबमन गिलसह ईशान किशन डावाची सुरुवात करण्यासाठी मैदानावर आला होता.

मात्र या सामन्यात हा बदल पाहायला मिळणं कठीण आहे. दुसऱ्या वनडेत रोहित आणि शुबमन गिलची जोडी मैदानावर उतरू शकते. तर गेल्या सामन्यात संधी न मिळालेला विराट कोहली यावेळी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येऊ शकतो.

पहिल्या वनडेत गिल पूर्णपणे फ्लॉप ठरला होता. त्याला अवघ्या ७ धावा करता आल्या होत्या. तर सूर्यकुमार यादव १९ आणि हार्दिक पंड्या ५ धावा करून माघारी परतला होता.

तर गोलंदाजांबद्दल बोलायचं झालं तर गेल्या सामन्यात उमरान मलिकला संधी दिली गेली होती. या सामन्यातही तो खेळताना दिसून येऊ शकतो. तर मुकेश कुमार आणि हार्दिक पंड्याने देखील चांगली गोलंदाजी केली होती.

भारतीय संघाकडून कुलदीप यादवने भारतीय संघाकडून सर्वाधिक ४ गडी बाद केले होते. त्यामुळे त्याला दुसऱ्या वनडेतही संधी दिली जाऊ शकते. (Latest sports updates)

दुसऱ्या वनडे सामन्यासाठी भारतीय संघाची प्लेइंग ११:

भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, ईशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, सूर्यकुमार यादव, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, कुलदीप यादव, उमरान मलिक, मुकेश कुमार.

वेस्टइंडीज : ब्रँडन किंग, एलिक अथनाज, शाई होप (कर्णधार आणि यष्टीरक्षक), कीसी कार्टी, शिमरोन हेटमायर, रोवमन पॉवेल, रोमारियो शेफर्ड, डोमिनिक ड्रेक्स, यानिक कारिया, गुडाकेश मोती, जेडेन सील्स.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Soan Papdi Recipe : जिभेवर ठेवताच विरघळेल अशी सोनपापडी; घरच्याघरी कशी बनवायची

Maharashtra News Live Updates: महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांचा वेगवान आढावा

Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; तीन वाहने एकमेकांना धडकली, पाहा VIDEO

Sukanya Samruddhi Yojana: १० हजार १५ वर्षे भरा, २१ व्या वर्षी मुलीच्या खात्यात तब्बल ३८ लाख; जाणून घ्या सरकारची भन्नाट योजना

Maharashtra Politics : महायुतीच्या जागावाटपाचं घोडं कुठं अडलं? कोणत्या पक्षाला काय हवं?

SCROLL FOR NEXT