IND vs SL, Asia Cup 2023 team india record  SAAM TV
क्रीडा

IND vs SL, Asia Cup 2023: टीम इंडियावर पहिल्यांदाच ओढवली ही नामुष्की; सामना जिंकला मात्र या नकोशा विक्रमाची झाली नोंद

Ankush Dhavre

IND vs SL, Asia Cup 2023 Team India Record:

कोलंबोच्या मैदानावर पार पडलेल्या सामन्यात भारत आणि श्रीलंका हे दोन्ही संघ आमने सामने होते. अंतिम फेरीत जाण्याच्या दृष्टीने हा सामना दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाचा होता. अखेर भारतीय संघाने या सामन्यात बाजी मारत अंतिम फेरीचं तिकीट मिळवलं आहे.

रोमांचक सामन्यात भारतीय संघाने भारतीय संघाने ४१ धावांनी विजय मिळवला. मात्र भारतीय संघाच्या नावे एका नको असलेल्या विक्रमाची नोंद झाली आहे.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी आलेल्या भारतीय संघातील फलंदाजांनी १० षटकांपर्यंत एकही विकेट गमावली नव्हती. त्यानंतर कर्णधार दासून शनाकाने चेंडू २० वर्षीय दूनिथा वेलालागेच्या हातात सोपवला. ही जबाबदारी योग्यरीत्या पार पाडत त्याने भारतीय संघातील टॉप ऑर्डरच्या फलंदाजांना एकापाठोपाठ एक पॅव्हेलियनची वाट दाखवली.

दूनिथा वेलालागेने या डावात रोहित शर्मा, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल आणि हार्दिक पंड्याला बाद करत माघारी धाडले. आपल्या स्पेलमध्ये त्याने १० षटके गोलंदाजी करत ४० धावा खर्च करत ५ गडी बाद केले. गोलंदाजीसह फलंदाजीतही त्याने मोलाचे योगदान दिले. धावांचा पाठलाग करताना त्याने नाबाद ४२ धावांची खेळी केली. (Latest sports updates)

भारतीय संघाच्या नावे झाली या विक्रमाची नोंद..

दूनिथा वेलालागेने ५ गडी बाद केल्यानंतर श्रीलंकेचे फिरकी गोलंदाज ॲक्शन मोडमध्ये आले. असलंकाने ईशान किशनची विकेट मिळवली. त्यानंतर त्याने रविंद्र जडेजा, जसप्रीत बुमराह आणि कुलदीप यादवला देखील बाद केलं.

यासह त्याने ४ विकेट घेतल्या. तर शेवटी महिश थिक्षणाने अक्षर पटेलला पॅव्हेलियनची वाट दाखवली. वनडे क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं आहे. जेव्हा फिरकी गोलंदाजांनी भारतीय संघाच्या १० फलंदाजांचा विकेट घेतला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील वाद चव्हाट्यावर

MVA News : मविआचा जागावाटपाचा तिढा सुटणार?

IND vs BAN 1st Test: W,W...आकाश 'दीप' पेटला! लागोपाठ 2 चेंडूंवर उडवल्या त्रिफळा; पाहा VIDEO

Patoda Bajar Samiti : पाटोदा बाजार समितीची ८१ गुंठे जमीन परस्पर विक्री; माजी सभापती विरोधात २६ वर्षांनी गुन्हा दाखल

Astrology Tips : काही केल्या लग्न जुळत नाहीये? वास्तुशास्त्रात दिलेले 'हे' उपाय एकदा करून तर पाहा

SCROLL FOR NEXT