India vs Sri Lanka T20 Match Saam tv
क्रीडा

India vs Sri Lanka T20 Match : टॉस आणि कर्णधाराच्या एका निर्णयाने सामना फिरणार; श्रीलंकेविरुद्ध टीम इंडियात कोणाला संधी मिळणार?

Vishal Gangurde

नवी दिल्ली : इंडिया विरुद्ध श्रीलंकेविरुद्ध तीन सामन्यांची टी२० मालिका आज शनिवारपासून सुरु होणार आहे. टीम इंडिया विरुद्ध श्रीलंकेचा पहिला सामना आज शनिवारी पल्लेकेले स्टेडियमवर होणार आहे. ही मालिका टीम इंडियासाठी खास असणार आहे.

श्रीलंकेविरुद्ध मालिकेत पहिल्यांदा टीम इंडिया गौतम गंभीरच्या प्रशिक्षणात पहिल्यांदा मैदानात उतरणार आहे. तर या संघाचं नेतृत्व सूर्यकुमार यादव करणार आहे. सूर्याकुमार यादवच्या नेतृत्वात याआधीही संघाचं नेतृत्व केलं आहे.

पल्लेकेले स्टेडियममध्ये मागील काही वर्षांत फार टी२० आंतरराष्ट्रीय सामने झालेले नाहीत. या मैदानात फलंदाजही चमकताना दिसतात. तर फिरकीपटू पेक्षा जलद गोलंदाजांसाठी स्टेडियममधील खेळपट्टी फायदेशीर आहे. या स्टेडियममध्ये टी२० सामन्यात ३० वेळा १५० हून अधिक धावा झाल्या आहेत. या स्टेडियममध्ये धावसंख्या २६३ ही उच्चांकी धावसंख्या आहे. सर्वाधिक धावसंख्या ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेविरोधात उभारली होती. या स्टेडियमध्ये दोन्ही संघ प्रथम फलंदाजी निवडण्याला पसंती देतील.

पल्लेकेले स्टेडियमवरील टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांचे विक्रम

पहिल्यांदा फलंदाजी केल्यानंतर जिंकलेल सामने - १३

लक्ष्याचा पाठलाग करताना जिंकलेले सामने - ९

नाणेफेक जिंकून जिंकलेले सामने - ७

नाणेफेक हरूनही जिंकलेले सामने - १५

सर्वात उच्चांकी धावसंख्या - २६३/३

सर्वात निच्चांकी धावसंख्या - ८८

चेज करताना केलेली धावसंख्या - १७८/२

पहिल्यांदा फलंदाजी करताना सरासरी धावसंख्या - १६१

इंडिया विरुद्ध श्रीलंका हेड टू हेड

भारत आणि श्रीलंकेदरम्यान आतापर्यंत २९ टी-२९ आंतरराष्ट्रीय सामने झाले आहेत. त्यातील १९ सामने टीम इंडियाने जिंकले आहेत. तर श्रीलंकेने ९ सामने जिंकले आहेत. तर एक सामना अनिर्णीत राहिला.

श्रीलंकेविरुद्ध टीम इंडियाचा संभाव्य संघ – सूर्यकुमार यादव (कर्णधार), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रिंकू सिंग, शुभमन गिल, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, , शिवम दुबे, हार्दिक पंड्या, यशस्वी जैस्वाल, अक्षर पटेल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Parbhani News: 'सबका बदला लुंगा फिर लौटुंगा', चिठ्ठी लिहली अन् १२ वीतील मुलाने मृत्यूला कवटाळलं; परभणीत खळबळ

VIDEO: राहुल गांधींच्या हस्ते कोल्हापूरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण

Marathi News Live Updates : मुंबई अहमदाबाद महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी

साउथ अभिनेत्याची मेहुणी गाजवणार Bigg Boss 18चं पर्व; केली धमाकेदार एन्ट्री, पाहा VIDEO

Chanakya Niti: आयुष्यात यशस्वी व्हयचंय? फॉलो करा 'हा' गुरु मंत्र

SCROLL FOR NEXT