Umran Malik Saamtv
Sports

Ind Vs SL: Umran Malik चा 155Kph च्या स्पीडने आग ओकणारा चेंडू अन् श्रीलंकन कर्णधाराची उडाली भंबेरी, पाहा Video

या वेगवान चेंडूवर मलिकने विकेट तर घेतलीच सोबतच आजपर्यंतचा कोणालाही न जमलेला विक्रम करण्याचाही कारनामा केला.

Gangappa Pujari

Ind Vs SL T20 Siries: श्रीलंकेविरुद्ध झालेल्या पहिल्या टी ट्वेंटी सामन्यात टीम इंडियाने रोमहर्षक विजय मिळवत मालिकेत विजयी आघाडी घेतली. या सामन्यात नवोदित उमरान मलिकच्या आग ओकणाऱ्या गोलंदाजीने श्रीलंकेच्या खेळाडूंची चांगलीच भंबेरी उडाल्याचे पाहायला मिळाले. सामन्यात तब्बल १५५ कीमी च्या स्पीडने टाकलेल्या चेंडूने श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाकाची दाणादाण उडाल्याचे पाहायला मिळाले. या चेंडूवर मलिकने विकेट तर घेतलीच सोबतच आजपर्यंतचा कोणालाही न जमलेला विक्रम करण्याचाही कारनामा केला.

श्रीलंकेविरुद्धच्या (Srilanka) पहिल्या टी ट्वेंटी सामन्यात उमरान मलिकच्या वेगवान गोलंदाजीने श्रीलंकेच्या कर्णधाराची चांगलीच त्रेधातिरपीट उडाल्याचे पाहायला मिळाले. सामन्यातील १० वे षटक उमरान मलिकने टाकले. यावेळी श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाका डावाला आकार देण्याचा प्रयत्न करत होता. मात्र या षटकातील चौथ्या चेंडूचा वेग पाहून लंकन कर्णधारही चकित झाला.

या चेंडूच्या वेगाने त्याचा गोंधळ उडाला त्यामुळे त्याला चेंडू बॅटवर कधी आला आणि कधी चहलकडे झेल गेला त्यालाही समजले नाही. या चेंडूच्या वेगात उमरान मलिकला बळी तर मिळालाच सोबतच आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचा विक्रमही त्याने आपल्या नावावर केला. या चेंडूनंतर उमरान मलिकने इरफान पठानला मागे टाकले. त्याने 153.7 किमी प्रतितास वेगाने चेंडू टाकला होता.

त्याचबरोबर भारतीय गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीचा वेग 153.36 किमी प्रतितास आहे. मोहम्मद शमीने 153.3 किमी प्रतितास वेगाने चेंडू टाकलाय. सैनीने 152.8 किमी वेगाने चेंडू टाकला होता. उमरानने या सगळ्या गोलंदाजांना मागे टाकत नवा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

दरम्यान या सामन्यात उमरान मलिकने ४ षटकांमध्ये ४७ धावा देत दोन बळी मिळवले. या विजयानंतर टीम इंडियाने या मालिकेत (T20 Siries) विजयी आघाडी घेतली आहे. सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाने २० षटकांमध्ये १६२ धावा केल्या होत्या तर श्रीलंकेला वीस षटकात १६० धावांवर संपुष्टात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

धमकीनंतरही बिग बींचा रविवारचा नियम कायम; चाहत्यांना भेटण्यासाठी शोधली भन्नाट शक्कल

Vastu Tips For Wall Clock: घरात घड्याळ कुठे लावावे? वास्तुशास्त्रानुसार योग्य दिशा कोणती?

Stylish Tops For Women: जीन्सवर कोणत्या प्रकारचे टॉप्स घालावेत? पाहा लेटेस्ट कलेक्शन

Jalgaon Firing: दुचाकीवरून आलेल्या तीन हल्लेखोरांकडून 25 वर्षीय तरुणावर बेछुट गोळीबार, भुसावळ हादरलं!

Co-Ords Sets Dress For Women: दिवाळीनिमित्त महिलांसाठी को-ऑर्ड सेट ड्रेसचे लेटेस्ट 5 पॅटर्न्स

SCROLL FOR NEXT