Rishabh Pant Accident: अपघातानंतर रिषभ पंतला BCCI देणार 16 कोटी; पाहा काय आहे 2011 चा रस्ते अपघात नियम?

या अपघातानंतर रिषभ पंतला अनेक महिने क्रिकेटपासून दुर रहावे लागणार असून त्याला आयपीएलही खेळता येणार नाही.
Rishabh Pant Car Accident
Rishabh Pant Car AccidentSAAM TV
Published On

Rishabh Pant Accident: भारतीय क्रिकेट संघाचा धडाकेबाज क्रिकेटपटू रिषभ पंतचा 30 डिसेंबरच्या पहाटे भीषण अपघात झाला. दिल्लीहून डेहराडूनकडे जात असताना पहाटे तीन वाजता हा अपघात घडला, ज्यामध्ये रिषभ पंत गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर दिल्लीमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या अपघातानंतर रिषभ पंतला अनेक महिने क्रिकेटपासून दुर रहावे लागणार असून त्याला आयपीएलही खेळता येणार नाही. या अपघातानंतर रिषभ पंतला बीसीसीआयकडून १६ कोटी रुपये मिळणार आहेत. काय आहे हा बीसीसीआयचा नियम, चला जाणून घेवू. (Rishabh Pant Car Accident)

Rishabh Pant Car Accident
Pune News: व्हॅाट्सॲप ग्रुप हल्ला प्रकरणात नवा खुलासा; नेमकं काय घडलं त्या दिवशी?

याबाबत अधिक माहिती अशी की, भीषण अपघातानंतर दिल्लीमध्ये उपचार घेत असलेल्या रिषभ पंतला पुढील उपचारासाठी मुंबईला हलवण्यात येणार आहे. मुंबईमध्ये त्याच्यावर पुढील उपचार केले जातील. या अपघातामुळे रिषभ पंत २०२३ ची आयपीएल खेळणार की नाही याबद्दल साशंकता आहे. त्यामुळे जर तो आयपीएलमध्ये खेळला नाही तर त्याला मानधन मिळणार का असाही प्रश्न पडला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार रिषभ पंतला दिल्ली कॅपिटल्सकडून १६ कोटी इतके मानधन मिळते. आता अपघातानंतर जरी तो आयपीएलमध्ये (IPL) खेळला नाही तरीही त्याला हे संपूर्ण मानधन मिळणार आहे. फक्त हे पैसे त्याला दिल्ली संघाकडून नाही तर बीसीसीआयकडून मिळणार मिळेल.

Rishabh Pant Car Accident
Ind Vs SL: अबब! वय फक्त 24 अन् शिवम मावी आहे कोट्यवधी संपत्तीचा मालक, कमाईचे आकडे पाहुन व्हाल थक्क

काय सांगतो नियम?

बीसीसीआयकडून केंद्रिय खेळाडूंना एक वीमा दिला जातो. ज्यामधून हे खेळाडू आयपीएलच्या आधी जखमी झाल्यास किंवा खेळाडूंचा अपघात झाल्यास त्यांचे संपूर्ण मानधन बीसीसीआयकडून दिले जाते. बीसीसीआयने हा कायदा २०११ मध्ये आणला होता.

गेल्यावर्षीही आयपीएलच्या आधी दिपक चाहर जखमी झाला होता, ज्यामुळे त्याला आयपीएलला मुकावे लागले होते. यावेळी त्याला चेन्नईकडून १४ कोटी रुपयांला विकत घेतले होते. त्याचे हे मानधन बीसीसीआयकडून मिळाले होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com