shivam mavi saam tv
Sports

Ind Vs SL: अबब! वय फक्त 24 अन् शिवम मावी आहे कोट्यवधी संपत्तीचा मालक, कमाईचे आकडे पाहुन व्हाल थक्क

आपला पहिलाच सामना खेळणाऱ्या शीवम मावीने चार विकेट घेत चमकदार कामगिरी केली. त्याचबरोबर तोच या सामन्याचा हिरोही ठरला.

Gangappa Pujari

Shivam Mavi Net Worth: श्रीलंकेविरुद्ध झालेल्या पहिल्याच टी ट्वेंटी सामन्यात भारतीय संघाने रोमहर्षक विजय मिळवला. या विजयासह भारताने तीन टी ट्वेंटी मालिकेमध्ये आघाडी घेतली आहे. श्रीलंकेविरुद्ध (Srilanka) आपला पहिलाच सामना खेळणाऱ्या शीवम मावीने चार विकेट घेत चमकदार कामगिरी केली. त्याचबरोबर तोच या सामन्याचा हिरोही ठरला. या सामन्यानंतर शिवम मावीच्या लक्झरी लाईफस्टाईलबद्दलही जोरदार चर्चा रंगली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टी ट्वेंटी सामन्यात शीवम मावीने चार बळी घेत भारताच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. भलेही शीवम मावीने आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये आत्ता पदार्पण केले असेल, मात्र तो अनेक वर्षांपासून आयपीएलमध्ये खेळत आहे. आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करत त्याने सर्वांचे लक्ष वेधले होते. त्यामुळेच त्याला मोठे मानधनही मिळाले होते. याच कमाईमुळे शिवम मावी लक्झरी लाईफ जगतो.

शिवम मावीच्या एकूण संपत्तीचा नेमका आकडा समोर आला नसला तरी माध्यमांमधील माहितीनुसार त्याच्याकडे तब्बल ४० कोटींची संपत्ती आहे. शिवम मावीने सर्वाधिक कमाई आयपीएलमधून (IPL) केली आहे. २०१८ मध्ये त्याला कोलकात्ता संघाने तीन कोटी रुपयांना खरेदी केले होते. त्याचबरोबर गेल्या वर्षीच्या लिलावात त्याच्यासाठी केकेआर संघाने ७.२५ कोटी रुपये मोजले होते. त्याचबरोबर या वर्षी त्याला गुजरात टायटन्स संघाने सहा कोटी रुपये दिले आहेत.

दरम्यान, लक्झरी लाईफ जगणाऱ्या शिवम मावीकडे आलीशान गाड्यांचा ताफा आहे. त्याच्या या ताफ्यात ऑडी ए ५ सारखी महागडी कार आहे. त्याचबरोबर अलिकडेच त्याने बीएमडब्लू कारही खरेदी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राज्यातील नऊ जिल्ह्यात उद्यापासून शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन खत विक्री सुरुवात होणार

Weather Update : पुढील काही तासांत पाऊस धुमाकूळ घालणार, महाराष्ट्रासह १५ राज्यांना अलर्ट; जाणून घ्या हवामानाचा अंदाज

Accident : अचानक सीएनजीचा स्फोट अन्...; २ आमदारांच्या गाडीचा भयानक अपघात, राजकारणात खळबळ

Korean Skincare Tips : कोरियन मुलींसारखा नॅचरल ग्लो हवा आहे? महिनाभर खा 'हे' ६ पदार्थ

Nagpur : नागपुरात मध्यरात्री गॅस गळतीने हाहाकार! ४० जण रुग्णालयात; या भागात जाण्यास बंदी

SCROLL FOR NEXT