ind vs SL T20 Siries Saamtv
क्रीडा

Ind Vs SL: टीम इंडिया 3 वर्षांनंतर पुण्यात! कुठे कसा बघाल सामना? असा असेल संभाव्य संघ

पहिला सामना जिंकून मालिकेत 1- ० ची आघाडी घेतलेला भारतीय संघ आज मालिका विजयाच्या इराद्याने मैदानात उतरेल.

Gangappa Pujari

Pune: भारत आणि श्रीलंका यांच्यामधील दुसरा टी ट्वेंटी सामना आज पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडिअमवर होणार आहे. पहिला सामना जिंकून मालिकेत १- ० ची आघाडी घेतलेला भारतीय संघ आज मालिका विजयाच्या इराद्याने मैदानात उतरेल. पाहूया या सामन्याचा संभाव्य भारतीय संघ.

श्रीलंकेविरुद्ध (Srilanka) दुसऱ्या टी ट्वेंटी सामन्यात विजय मिळवण्यासाठी मैदानात उतरणारी टीम इंडिया तीन वर्षांनी पुण्यात सामना खेळत आहे. भारत आणि श्रीलंका संघातील दुसरा टी20 सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी 7 वाजता सुरू होईल. त्यापूर्वी 6.30 वाजता नाणेफेक होईल. स्टार स्पोर्ट्सच्या वेगवेगळ्या टीव्ही चॅनेलवर हिंदी आणि इंग्रजीसह इतर भाषांमध्येही समालोचनासह हे सामने पाहता येतील.

अशी असेल दोन्ही संघांची प्लेईंग इलेवनः

भारतीय संघः हार्दिक पंड्या (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुबमन गिल, सूर्यकुमार यादव, राहुल त्रिपाठी, दीपक हुडा, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शिवम मावी, ईशान किशन, जितेश शर्मा, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल, उमरान मलिक, मुकेश कुमार. (Indian Team)

श्रीलंका संघ - पथुम निसांका, कुसल मेंडिस (यष्टीरक्षक), धनंजया डी सिल्वा, चरित असलंका, भानुका राजपक्षे, दसून शनाका (कर्णधार), वानिंदू हसरंगा, चमिका करुणारत्ने, महीश थीक्षणा, कसून रजिथा, दिलशान मदुशंका, लाहिरू कुमारा, अविष्का फर्नांडो, अशेन बंदारा, प्रमोद मदुशन, दुनिथ वेललागे, नुवान तुषारा, सदीरा समरविक्रमा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : भाजपला का हवेत फडणवीसच? संघही अनुकूल, आमदारांचाही पाठिंबा

Mumbai Crime : केमिकलचे स्प्रे मारून कुत्र्याचा डोळा केला निकामी; भांडुपमधील महिलेचं घृणास्पद कृत्य, पोलिसांत गुन्हा

Guru Margi 2025: बृहस्पती 'या' राशींच्या नशीबाचे दरवाजे उघडणार; सुख-समृद्धीसह-धनसंपत्तीही वाढणार

Maharashtra Politics: EVM विरोधात लढण्याचा पवारांचा निर्धार! आंदोलन उभारण्याचा ठाकरेंचा इशारा

Viral Video: मराठी बोलल्यानं तिकीट नाकारलं! नाहूरमध्ये नेमकं काय घडलं? - VIDEO

SCROLL FOR NEXT