Rishabh Pant Accident News
Rishabh Pant Accident News Saam Tv
क्रीडा | IPL

Ind Vs SL ODI Series: अपघातानंतर रिषभ पंतच्या जागी कोण? BCCI ने केली 'या' खेळाडूची निवड, पहिल्या वनडेमध्ये खेळणार

Gangappa Pujari

Ind Vs SL ODI Siries: भारत आणि श्रीलंका यांच्यामधील पहिला एकदिवसीय सामना आज गुवाहाटीमध्ये रंगणार आहे. टी ट्वेंटी मालिकेत दमदार विजय मिळवल्यानंतर आता भारतीय संघ वनडेमध्ये श्रीलंकेला धुळ चारण्यासाठी सज्ज झाला आहे. मात्र क्रिकेटपटू रिषभ पंतच्या (Rishabh Pant) अपघातानंतर मधली फळी कोण सांभाळणार असा प्रश्न निवड समितीपुढे होता. यावर तोडगा काढला असून पहिल्या एकदिवसीय सामन्यात या खेळाडूला संधी देण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, इंडियाचा स्टार विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंतच्या कारला 30 डिसेंबर 2022 रोजी भीषण अपघात झाला. त्यात तो गंभीर जखमी झाला. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ऋषभला मैदानावर परतण्यासाठी कमीत कमी 8 ते 9 महिने लागू शकतात. त्यामुळे येणाऱ्या दिवसात विकेटकीपर फलंदाज म्हणून केएल राहुल निवड समितीची (BCCI) पसंती असेल. श्रीलंकेविरुद्धच्या वनडे सीरीजसाठी विकेटकीपर म्हणून केएल राहुल आणि इशान किशन यांचा टीममध्ये समावेश केला आहे.

दरम्यान, केएल राहुल या सीरीजआधी काहीवेळा विकेटकीपर म्हणून टीम इंडियामध्ये खेळला आहे. या सीरीजमध्येही तो याच रोलमध्ये दिसेल. केएल राहुलच्या बॅटिग ऑर्डरमध्येही बदल दिसेल. तो बऱ्याचदा रोहित शर्मासोबत ओपनिंगला दिसला होता. पण आता तो मीडिल ऑर्डरमध्ये दिसेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi News | गर्दी गोंधळ आणि एकच राडा! राहुल गांधींच्या 'त्या' सभेत काय घडलं?

Farooq Abdullah: मोठी बातमी! फारुख अब्दुल्ला यांच्या सभेत चाकूहल्ला

Hair Removal Creams: शरीरावरील अनावश्यक केस काढण्यासाठी हेअर रिमूव्हल क्रीम वापरताय?

Today's Marathi News Live: अवकाळी पावसामुळे मुंबई - गोवा महामार्गावरील वाहतूक मंदावली

Pune Hit and Run Case | सकाळी अटक दुपारी जामीन! पुणे हिट अपघात प्रकरणात मोठा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT