Shubhman Gill Century Saamtv
क्रीडा

Ind Vs SL ODI Series: शुभमन गिलची कमाल! तिसऱ्या वनडेत तडाखेबंद शतकी खेळी; गंभीरचाही रेकॉर्ड मोडला

श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात गिलने जबरदस्त फलंदाजी करताना शतक झळकावले. गिलचे वनडे क्रिकेटमधील हे दुसरे शतक आहे.

Gangappa Pujari

Ind vs SL ODI Series: भारत आणि श्रीलंकेविरुद्ध सुरु असलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात शुभमन गिलची शतकी खेळी पुर्ण झाली आहे. श्रीलंकेच्या गोलंदाजांची धुलाई करत गिलने ही जबरदस्त खेळी केली. श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात गिलने जबरदस्त फलंदाजी करताना शतक झळकावले. गिलचे वनडे क्रिकेटमधील हे दुसरे शतक आहे.

गुवाहाटीमध्ये शतकापासून दूर राहिलेल्या आणि कोलकात्यात चांगली सुरुवात केल्यानंतर विकेट गमावलेल्या गिलने तिरुअनंतपुरमच्या ग्रीनफिल्ड स्टेडियममध्ये जबरदस्त शतकी खेळी करण्याचा पराक्रम केला. (Srilanka)

शेवटच्या एकदिवसीय सामन्यात प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय संघासाठी शुभमन गिलने कर्णधार रोहित शर्मासह चांगली सुरूवात केली. दोघांमध्ये 96 धावांची भागीदारी झाली, ती रोहित बाद झाल्यामुळे संपली. मात्र गिल फटकेबाजी करत राहिला आणि आपले अर्धशतक पूर्ण केले. यानंतर गिलने विराट कोहलीसह डाव पुढे नेला आणि आपल्या शतकाकडे वाटचाल केली.

या शतकी खेळीसोबतच शुभमन गिलने श्रीलंकेविरुद्ध शतक ठोकणारा दुसरा सर्वात युवा खेळाडू (23, वर्ष) होण्याचा मान मिळवला आहे. त्याने गौतम गंभीरला (24, वर्ष) मागे टाकत दुसरे स्थान पटकावले आहे. तर या यादीत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर (21, वर्ष) पहिल्या स्थानावर आहे.

दरम्यान, या शतकी खेळीत गिलने १४ चौकार आणि दोन षटकारांची आतशबाजी केली. गिल ११६ धावा करत बाद झाला. तर दुसरीकडे कर्णधार रोहित शर्मानेही (Rohit Sharma) ४५ धावांची जबरदस्त खेळी केली. परंतु त्याला मोठ्या खेळीत मात्र रुपांतर करण्यात आले नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Awas Yojana: PM आवाससाठी आता पोर्टलवरून अर्ज! १.८० लाखांची सबसिडी मिळणार, प्रक्रिया आणि कार्यप्रणाली कशी आहे?

Ajit Pawar : ताईंना CM करण्यासाठी अजित पवारांना बदनाम केलं, फडणवीसांचा आरोप, सुप्रिया सुळेंचा पलटवार

Shani Margi 2024: शनीच्या मार्गी चालीने अडचणी वाढणार; 'या' राशींवर राहणार शनिदेवाचं सावट!

Rohit Sharma: रोहित शर्माच्या घरी आला 'ज्युनिअर हिटमॅन', रितिकाने दिला मुलाला जन्म

Maharashtra Rain :थंडीची प्रतीक्षा कायम! ८ जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता, वाचा आजचा हवामानाचा अंदाज

SCROLL FOR NEXT