sara ali khan and shubman gill 
Sports

Viral Video: अरेरे! शतकवीर गिल फिल्डिंगला आला अन् प्रेक्षकांनी 'सारा सारा' चा जयघोषचं सुरू केला, Video होतोय तुफान व्हायरल

भारतीय सलामवीर शुभमन गिलच्या शतकी खेळीपेक्षा एका व्हायरल व्हिडिओचीच जोरदार चर्चा रंगली आहे. या व्हिडिओमध्ये शुभमन गिलला प्रेक्षक सारा सारा म्हणून चिडवताना दिसत आहेत.

Gangappa Pujari

Ind Vs Srilanka ODI Series: भारत आणि श्रीलंका यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना नुकताच पार पडला. मालिकेतील अंतिम सामन्यात सलामवीर शुभमन गिलने तडाखेबंद शतकी खेळी केली. त्याच्यासोबत विराट कोहलीनेही श्रीलंकन गोलंदाजांची धुलाई करताना वादळी दीडशतकी खेळी केली. या दोन शतकांमुळेच टीम इंडियाने धावांचा डोंगर उभा करत हा सामना तब्बल ३१७ धावांनी विजय मिळवला.

पण, सध्या भारतीय सलामवीर शुभमन गिलच्या शतकी खेळीपेक्षा एका व्हायरल व्हिडिओचीच जोरदार चर्चा रंगली आहे. या व्हिडिओमध्ये शुभमन गिलला प्रेक्षक सारा सारा म्हणून चिडवताना दिसत आहेत. (Viral Video)

याबाबत अधिक माहिती अशी की, शुभमन गिल श्रीलंकेची फलंदाजी सुरु असताना सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षण करत होता. त्यावेळी त्याला पाहून स्टेडिअममध्ये बसलेल्या प्रेक्षकांच्या समूहाने अचानक ‘सारा…सारा’ ओरडण्यास सुरुवात केली. तसेच, गिलला चिडवण्याचा प्रयत्न केला.

या घटनेचा व्हिडिओ एका युजरने सोशल मीडियावर शेअर केला. यानंतर हा व्हिडिओ काही क्षणातच व्हायरल झाला. खरं तर, सोशल मीडियावर अशी चर्चा रंगली आहे की, शुबमन गिल आणि सारा अली खान (Sara Ali Khan) हे एकमेकांना डेट करत आहेत. कारण दोघेही काही दिवसांपूर्वी एकत्र स्पॉट झाले होते.

तेव्हापासून शुभमन गिल आणि सारा अली खान यांच्या प्रेमप्रकरणाची चर्चा माध्यमांमध्ये रंगली होती. त्याचबरोबर शुभमन गिल आणि सचिन तेंडूलकरची (Sachin Tendulkar) मुलगी सारा तेंडूलकर यांच्याही नावाची चर्चा होताना दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cyber Crime: बॅंकिग फ्रॉड टाळण्यासाठी 'या' टिप्स करा फॉलो

Ind Vs Eng 4th Test : मँचेस्टरमध्ये इंग्लंडचा रडीचा डाव? कसोटी जिंकण्यासाठी बॉल टॅम्परिंग? पाहा Viral Video

Shubman Gill : गिल दा मामला...! मँचेस्टर कसोटीत शुभमन गिलचे शतक, कॅप्टनने अनेक रेकॉर्ड मोडले

Gold Price: सोन्याची उसळी! सोन्याचा दर लवकरच 1 लाख 10 हजारांवर जाणार

Shivani Rangole: टिव्हीतल्या 'मास्तरीणबाई' चं सौंदर्य लाखात एक, फोटोंवर लाईक्स

SCROLL FOR NEXT